सुफी संत ताजुद्दीन बाबा जन्मोत्सव थाटात…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

कन्हान : – सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेले सुफी संत हजरत बाबा ताजुदीन रहमतुल्लाह अलैह यांच्या १६३ वा जन्मोत्सव धरम नगर कन्हान येथे थाटात साजरा करण्यात आला. 

        शनिवार (दि.२७) जानेवारी ला सायंकाळी ६ वाजता गं.भा.रजनी सातपुते पिपरी रोड धरम नगर कन्हान येथे सुफी संत हजरत बाबा ताजुदीन याच्या जन्मदिवसा निमित्य केक कापुन संदल, घोडे, बँड वाजा, फटाक्याच्या आतिश बाजी सह पालखी मिरवणुक काढुन पिपरी, पटेल नगर, गांधी चौकातुन महामार्गाने आंबेडकर चौक, तारसा रोड चौक परत पिपरी रोड ने धरमनगर कन्हान येथे महाप्रसाद वितरण करून सुफी संत हजरत बाबा ताजुदीन यांचा जन्मोत्सव थाटात करण्यात आला.

         कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आयोजक श्री उमेश सातपुते, सौ. सिमा सातपुते आणि रूपेश सातपुते, सचिन साळवी, पुरूषोत्तम येणेकर, बंटी हेटे, शिव स्वामी सह ताजश्री मित्र परिवार सदस्यानी सहकार्य केले.