नवेगाव खैरी येथे ताजुद्दिन बाबा जन्मोत्सव उत्साहात साजरा…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवनी

 पारशिवनी तालुक्यातील नवेगाव येथे दि. २७/१/२०२४ शनिवार ला सर्वधर्मसमभाव आणि मानवतेची शिकवण देणारे बाबा ताजुद्दीन यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला जातो.

          या पार्श्वभूमीवर राशिद शेख व मित्र परिवार तर्फे नवेगाव खैरी येथील पेंच चौकात शनीवार २७ जानेवारीला र.अ.जी हजरत बाबा ताजुद्दीन यांचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नागपूर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती व राष्ट्रीय आदर्श विद्यालय शिक्षण मंडळाचे संचालक अंशुलदादा देशमुख यांचे हस्ते केक कापण्यात आला. उपस्थितांना महाप्रसाद स्वरूप भोजनदान देण्यात आले.

          यावेळी कार्यक्रमाचे आयोजक राशिद शेख, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ ठाकूर, शालिक ढोंगे (संचालक, कृ.उ.बा. समिती), आकाशझेप फाऊंडेशनचे सचिव साक्षोधन कडबे, भारत देशमुख, अरविंद उकुंडे, साहेबराव निंबाळकर, वसंता दरवई, नंदू मस्के, रामेश्वर पनवारे, प्रकाश ढोरे, सचिन राऊत, राजा धार्मिक, निशांत काळसरपे, देवचंद ढोरे, महादेव धार्मिक, दिपक गजभिये, महादेवराव धार्मिक, बापू राऊत, पुरुषोत्तम दुनेदार, सैबाज शेख आणि बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.