पारशिवनी तालुक्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा.. — २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन थाटात साजरा..

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌ 

कन्हान : – शहर व ग्रामिण भागात शाळा,विद्यालय,क.विद्यालय,विविध शासकिय कार्यालय,सामाजिक संस्था व्दारे शुक्रवार (दि.२६) जानेवारी २०२४ ला विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि ध्वजारोहन करून गणराज्य दिन थाटात साजरा करण्यात आला.

**

धर्मराज शैक्षणिक परिसरात ध्वजारोहण.‌..

कन्हान – येथील धर्मराज शैक्षणिक परिसरात ७५ व्या गणराज्य दिनानिमित्त मेहर गुरुजी यांच्या अध्यक्षतेत इंदिरा एज्युकेशन सोसायटी पिवळी नदी नागपुरचे संस्थापक सचिव श्री. खुशालराव पाहुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

        कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपमुख्याध्यापक श्री. प्रकाश डुकरे,मुख्याध्यापक श्री. खिमेश बढिये,ज्येष्ठ शिक्षक श्री. हरिष केवटे,माजी सरपंच बलवंत पडोळे,माजी उपसरपंच बबलु बर्वे,माजी ग्रा.पं.सदस्य श्री. चंद्रशेखर बावनकुळे,माजी ग्रा.पं सदस्य सौ.अरुणा हजारे,महादेव किरपान,पालक प्रतिनिधी श्री रोशन भोयर,मेकअप आर्टिस्ट कल्याणी सरोदे,श्री.सुनिल लाडेकर आदी उपस्थित होते.

         यावेळी हर्षमिता घोडमारे के जी २,फाल्गुनी बावीसताले, पूर्वी सोमकुंवर,डॉली घरडे,प्रिया ठाकरे,नंदिनी बंड या विद्यार्थ्यांनी गणराज्य दिनाच्या निमित्त भाषण सादर केले.

          यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आले.यावेळी संगीत शिक्षक श्री.नरेंद्र कडवे यांच्या चमुने वंदेमातरम व ध्वजगीत सादर केले. 

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री.प्रकाश डुकरे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन श्री.मोहन भेलकर यांनी तर आभार मुख्याध्यापक श्री.खिमेश बढिये यांनी मानले.

        कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचा ऱ्यांनी सहकार्य केले.

***

हीराबाई शाळेत गणराज्य दिन, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..

          श्रीमती हीराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येते ” मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा ” अंतर्गत सांस्कृतिक व विविध कार्यक्रम घेण्यात आले.

      यात परसबाग विकसित करणे,वर्ग सजावट,शाळा सजावट,वॉल कंपाऊंड सजावट,शाळा परिसर स्वच्छ,स्वच्छ्ता रॅली,मतदानाची शपथ,कबड्डी,खो खो,लंगडी धावणे,चित्रकला स्पर्धा आदी स्पर्धा घेण्यात आल्या.

          शुक्रवार (दि.२६) जानेवारीला शाळेचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वाघमारे आणि माजी मुख्याध्यापिका वंदना रामापुरे यांचा हस्ते प्रतिमेचे पूजन करुन राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. 

      तदनंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे दिली,विविध नृत्य,लावण्या सादर करून तसेच भक्ति गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली.

       तसेच श्री.नरेंद्र वाघमारे यांच्या हस्ते पालक वर्ग व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करून बक्षीस वितरण करण्यात आले. 

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका आयेशा अन्सारी यांनी केले तर आभार प्रदर्शन नेहा गायधने नी केले.कार्यक्रमाच्या यशस्विते करिता पवनकुमार ठमके,आयेशा अन्सारी,जयश्री पवार,गीता वंजारी,अभिषेक मोहनकर, किर्ती वैरागडे, भास्कर सातपुते,मंदाकिनी रंगारी,गणेश रामापुरे सह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांनी सहकार्य केले.

***

यशवंत विद्यालय वराडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

        २६ जानेवारी २०२४ ला यशवंत विद्यालय वराडा येथे शाळेचे संचालक श्री.भुषण निंबाळकर यांच्या अध्यक्षेत ग्रा.प. नवनियुक्त सरपंच श्री.सुनिल जामदार यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आला. 

       याप्रसंगी माजी उपसभापती देवाजी शेळके,पोलिस पाटील संजय नेवारे, ग्रा.प.सदस्य श्री. रविंद्र खिळेकर,माजी ग्रा.प. सदस्य संजय टाले आदींच्या उपस्थित विद्यार्थ्यानी सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.शाळेत घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रम व स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षिष वितरण करून गणराज्य दिन थाटात साजरा करण्यात आला.

        मुख्याध्यापिका कीर्ती निंबाळकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन प्रजासत्ताक दिन व शाळेची प्रगती विषयक माहिती सादर केली.

         सुत्र संचालन श्री.राकेश गणविर सर यानी तर आभार श्री. सतिश कुथे यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता क्रिडा शिक्षक राजेंद्र गभणे,राकेश गण विर,सतिश कुथे,अर्चना शिंगणे,उज्वला पुसदकर,मोतीराम रहाटे,दिपक पांडे सह विद्यार्थ्यानी सहकार्य केले. 

***

विवेकानंद ट्रस्ट व ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व्दारे प्रजासत्ताक दिन साजरा..

      विवेकानंद सेवा ट्रस्ट व ग्रामौन्नती प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव यांचे व्दारे त्यांचे निवास स्थान विवेकानंद नगर कन्हान येथे दरवर्षी प्रमाणे श्री.दिवाळुजी देशमु़ख गुरूजींच्या हस्ते भारत माता,सेवानिवृत सैनिक शेरू भाई शेख व्दारे महात्मा गांधी,सेवानिवृत पोलिस अधि कारी गणेश खांडेकर यांच्या च्या हस्ते डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले व राजन नायर यांचे हस्ते राष्ट्रध्वजाचे पुजन करण्यात आले.

        कॉग्रेस कमेटी नागपुर जिल्हा ग्रा.उपाध्यक्ष नरेश बर्वे यांचे हस्ते ध्वजारोहन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. 

       याप्रसंगी श्री.बंडुजी कापसे,नरेश बर्वे आदीनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशभाऊ जाधव यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव फक्त शहरातच हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला.आज ही प्रगती शहरातच होताना दिसते,परंतु ज्या गावामुळे शहरे विकसित होत आहेत तिच गावे विकासाच्या दुष्टीने मागास पडत आहे असे सांगितले. 

        कृषी प्रधान देशात शेतक-यांच्या विविध समस्येनी बळीराजा चिंतातुर आणि दैना अवस्थेत येवुन पोहचा आहे,भयंकर बेरोजगारी मुळे युवकांची परिस्थिती सुध्दा अत्यंत नाजुक झाली आहे.अश्या प्रखरतेने संबोधन करून ” चलो गाव की और ” चा संदेश देत ” आता फक्त लढायचे शेतक-यांच्या हिता करिताच.” निश्चय करून उपस्थिताना माजी खासदार प्रकाशभाऊंनी मंत्रमुग्ध केले.

        विवेकानंद सेवा ट्रस्ट उपाध्यक्ष कमलेश पांजरे यांनी प्रजास्ताक दिन व दोन्ही संस्थेच्या कार्य विषयी प्रास्ताविकातुन माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन रविंद्र चकोले हयानी तर आभार ग्रामोन्नती प्रतिष्ठाण सचिव मोतीराम रहाटे हयानी मानले.

        याप्रसंगी डॉ.वराडे,न.प.उपाध्यक्ष योगेश रंगारी,नगरसेवक राजेंद्र शेंदरे,मनिष भिवगडे,विनय यादव,माजी उपसरपंच चंद्रशेखर कळमदार,शांताराम जळते,पटले गुरूजी,नथुजी चरडे,नेवालाल पात्रे सह सेवानिवृत शिक्षक,भारतीय सैनिक,पोलिस अधिकारी,कर्मचारी,जेष्ठनागरिक, व्यापारी,प्रतिष्ठित नागरिक,आशा वर्कस,आगणवाडी सेविका,सामाजिक राजकिय पदाधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. 

       कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता दिलीप राईकवार,कोठीराम चकोले,सचिन साळवी,प्रविण गोडे,गणेश भोंगाडे,विजय डोणेकर,गोविंद जुनघरे,बंटी हेटे,जिवन ठवकर,रूपेश सातपुते,राजु गणोरकर,प्रतिक जाधव,कमलसिंह यादव,निलेश गाढवे,संजय शेंदरे,संजय चहांदे,आकाश पंडितकर,केतन भिवगडे,सोनु कुरडकर,यशवंत खंगारे,अशोक मेश्राम,हफीज शेख,प्रशांत येलकर,मनोज गुडधे,पुरुषोत्तम येणेकर,शिव स्वामी,प्रकाश निमोडे,शितल भिमणवार,आशिष वडस्कर,निशांत जाधव,कृणाल आगुलेटवार सह अनेक कार्यकर्ते व सदस्यानी सहकार्य केले. 

***

प्रजासत्ताक दिन कन्हान शहर विकास मंच द्वारे उत्साहाने साजरा..

      कन्हान शहर विकास मंच द्वारे ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले. 

         कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे,ताराचंद निंबाळकर यांचा हस्ते महात्मा गांधी, शलाला बहादुर शास्त्री,डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले,शहिद भगत सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. 

         यावेळी शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर,प्रदीप बावणे,संजय तिवसकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

       तिरंगा झेंडाला सलमी देऊन राष्ट्रगीत गायन करुन प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला. 

       या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर,मार्गदर्शक प्रभाकर रुंघे,ताराचंद निंबाळकर, प्रदीप बावने,भुषण खंते,संजय तिवसकर,हरीओम प्रकाश नारायण,प्रकाश कुर्वे,अनुराग महल्ले,कृणाल राजपुत,सुजल यादव,अमन यादव,ओम यादव, शाहरुख खान,सचिन यादव, नितिन मेश्राम आदि मंच सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

***

कामगार कल्याण केंद्र कन्हान येथे प्रजासत्ताक दिन साजरा..

       कामगार कल्याण केंद्र कन्हान येथे प्रजासत्ताक दिना निमित्य ध्वजारोहण प्रमुख पाहुणे श्री जगन कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

      त्यांनी महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन ध्वजारोहण करण्यात आले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रंजना पौनिकर मॅडम यांनी केले.याप्रसंगी नरेश साकोरे,सुनंदा कठाणे,जाधव मॅडम,वनिता कावळे,कुसुम मेहरकुळे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता प्रेमा कावळे यांनी सहकार्य केले.

***

विष्णु लक्ष्मी नगर वाघधरे वाडी कन्हान येथे प्रजासत्ताक दिन साजरा..

     तारसा रोड कन्हान येथील पावर हाऊस जवळ झेंडा चौक विष्णु लक्ष्मी नगर वाघधरे वाडी येथे भारतीय गणराज्य दिवसा निमित्य माजी जि.प.सदस्य श्री. अंबादास खंडारे यांचे अध्यक्षेत व श्री.दिगांम्बर हारगुडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

        याप्रसंगी उमेश पौनिकर, अमित मोटघरे,आनंद सहारे,रघुनाथ पात्रे,समिर मेश्राम,सन्नी पात्रे,विजय वाघमारे,दलजित पात्रे, रामु खडसे,भुरा पात्रे,महेंन्द्र खडसे,सतिश नाडे,ज्योती प्रसाद भालेकर,सोनु लोंढे,मेहेर इंचुलकरआदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार नेवालाल पात्रे हयांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्विते करिता सावन लोंढे,किशोर शेन्डे, सिद्धार्थ पात्रे,रोहित खडसे,नाना गायकवाड,अर्जुन पात्रे,सतिश पेठारे,रोहन रोकडे,अंगददेव पात्रे आदीनी परिक्षम घेऊन सहकार्य केले. 

**

एमजीएस संविधानिक हक्क संघटन कन्हान येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला..

      सत्रापुर कन्हान येथे एमजीएस संविधानिक हक्क संघटन कन्हान सचिव अर्जुन पात्रे यांच्या अध्यक्षेत श्री.रामेश्वरजी शेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून गणराज्य दिन कार्यक्रम उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला. 

         कार्यक्रमास राजन भिसे,देविदास खडसे,रामु खडसे,महेंद्र पात्रे,वसंता पात्रे, अनिल लोंढे,शेलेन पात्रे,रणजित खडसे,नितेश पात्रे,मुरली पात्रे,डबलु खडसे,सावन पात्रे, देवानंद पेटारे,जैन इंचुरकर, अरविंद लोंढे,निमचंद पात्रे,शिव पात्रे,गणेश भालेकर,समशेर पूरवले,आकाश भिसे,धनंजय कापसिकर,संदीप शिंदे,अतिश शेंडे,कालु लोंढे,अजय कापसिकर,धिरेन खडसे,राज भिसे,सागर शेंडे,विशाल शेंडे, सेवर लोंढे,शक्ती शेंडे,साजन देडे, शिरीष त्रिपाठी,शोभा शेंडे,शिला पात्रे,मनिषा पात्रे,चंपा वाणी,सुदेश शेंडे,ज्वाला खडसे,रितेश भिसे,विजय लोंढे, विक्की पात्रे,शेलेन खडसे, आकाश पात्रे, विरेन गायकवाड, किरण शेंडे, लक्ष्मण पात्रे, अर्जुन गायकवाड, विनोद लोंढे आदी सह नागरिक उपस्थित होते.