सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे महात्मा गांधी यांच्या 76 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न.

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

कन्हान:-आज दि. 30/01/2024 रोज मंगळवारी ठिक 7.00 वाजता संध्याकाळी सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे महात्मा गांधी यांच्या 76 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम श्री देवरावजी कावळे यांच्या अध्यक्षतेखाली श्री गंगाधरजी अवचट यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच श्री मनोहर कोल्हे सचिव श्री अभिषेक निमजे श्री प्रथम कामडे, श्री आशिष घोरपडे, श्री गोपाल बागडे, श्री यश तेलोते, श्री शुभम शेंडे इत्यादी वाचक व सभासदाचे उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.

           सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केले यानंतर सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पण केले. यानंतर सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे उभे राहून मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.

           कार्यक्रमाचे संचालन श्री दिनकरराव मस्के यांनी केले तर श्री श्याम बारई ग्रंथपाल यांनी आभार प्रदर्शन केले. आभार प्रदर्शन नंतर कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करण्यात आले.