Home Political आदिवासी, अल्पसंख्यांक आणि बहुजन समाजाच्या वाढत्या पाठींब्याने ‘परिवर्तन पॅनल’ मजबूत स्थितीत…

आदिवासी, अल्पसंख्यांक आणि बहुजन समाजाच्या वाढत्या पाठींब्याने ‘परिवर्तन पॅनल’ मजबूत स्थितीत…

ऋषी सहारे 

   संपादक 

गडचिरोली : विविध आंबेडकरी पक्ष व संघटनानी एकत्र येऊन गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीसाठी निर्माण केलेल्या ‘गडचिरोली परिवर्तन पॅनल’च्या समर्थनार्थ शहरातील अनेक आदिवासी, अल्पसंखांक व बहुजन संघटना जोमाने प्रचारकार्यात उतरल्याने परिवर्तन पॅनलच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वनिता बांबोळे आणि त्यांचे सहकारी नगरसेवक पदाचे उमेदवार मजबूत स्थितीत दिसत आहेत.  

        अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेचे अध्यक्ष विनोद मडावी आणि बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, साहित्यिक दशरथ मडावी यांनी परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठींबा देत असल्याचे लेखी पत्र दिले आहे तर मुस्लीम व माळी समाज समुदायातील विविध नेत्यांनी परिवर्तन पॅनलच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वनिता बांबोळे यांची भेट घेऊन यांची भेट घेऊन फुले-आंबेडकरी विचारधारेच्या अधिष्ठानावर निर्माण झालेल्या परिवर्तन पॅनल सोबत आपण सदैव असू असे सांगितले. 

       प्रस्थापित, भ्रष्ट आणि ठेकेदारी प्रवृत्तीच्या हातातून नगरपरिषदेतील सत्ता हिसकावून घेत गडचिरोली शहराचा शाश्वत विकास, स्वच्छता, सुरक्षा आणि प्रामाणिक प्रशासन देण्यासाठी ‘गडचिरोली परिवर्तन पॅनल’ पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. परिवर्तन पॅनलच्या वतीने निवडणूक लढणाऱ्या सर्व उमेदवारांनी ‘आम्ही कोणतीही ठेकेदारी करणार नाही’ असे आश्वासन दिल्याने या आघाडीला शहरातील सर्वस्तरातील नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

       परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सुरक्षित, स्वच्छ, हरित, आणि समृद्ध गडचिरोलीच्या निर्माणाचे आश्वासन देणारा ‘जाहीरनामा’ या निवडणुकीसाठी परिवर्तन पॅनलने घोषित केला असल्याने या जाहीरनाम्याची सर्वत्र चर्चा आहे. कमिशनखोर प्रवृत्तीच्या भ्रष्ट ठेकेदारांना कांटाळलेल्या सामान्य नागरिकांना परिवर्तन पॅनलच्या रूपाने एक नवी विश्वासपात्र आघाडी मिळाली आहे.

        आज गडचिरोली शहरात परिवर्तन पॅनलद्वारे काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला सर्वसामान्य नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत ‘परिवर्तन पॅनल’ च्या प्रचारातील आघाडीने हि निवडणूक आता चौरंगी झाली असून यात परिवर्तन पॅनल बाजी मारेल असे चर्चा सर्वत्र सुरु आहे.