रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक 8 साठी विकासाचा मसुदा जाहीर केला असून, नागरिकांच्या अपेक्षांना प्राधान्य देत मुलभूत सुविधा, स्वच्छता, हरित पर्यावरण, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पारदर्शक प्रशासन यांचा एकात्मिक आराखडा यात मांडण्यात आला असता दरम्यान प्रभाग क्रमाक – 8 मधील उमेदवार ईशांत अरुण मामीडवार व सौ श्रुतिका भरत बंडे व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे.
प्रभाग क्रमांक 8 मधून गट-अ चे काँग्रेस उमेदवार ईशांत अरुण मामीडवार व गट-ब मधूनसौ श्रुतिका भरत बंडे तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सारीका मनिष नंदेश्वर हे जनतेचा कौल मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
जाहीरनाम्यात खालील प्रमुख मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे – मुलभूत सुविधांमध्ये क्रांती-
प्रभागातील प्रत्येक गल्लीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ते, जलवाहिनी व ड्रेनेजची मजबूत व्यवस्था निर्माण करण्याच्या योजना या जाहीरनाम्यात समाविष्ट आहेत.
तसेच पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, पुरेशा स्ट्रीटलाईट्स, आणि प्रभावी कचरा व्यवस्थापन प्रणाली निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
हरित व स्वच्छ प्रभागाचा संकल्प – पर्यावरणाशी सुसंगत विकास साधण्यासाठी काँग्रेस उमेदवारांनी प्रत्येक वॉर्डात लहान उद्याने आणि ओपन एअर जिम उभारण्याची घोषणा केली आहे.
“आपला वॉर्ड – हरित वॉर्ड” या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण मोहिमा आणि प्लास्टिक मुक्त प्रभाग साकारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
शिक्षण, युवा व क्रीडा प्रोत्साहन – प्रभागातील सरकारी व स्थानिक शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, ग्रंथालय सुविधा यांची उभारणी केली जाईल.
युवकांसाठी करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास, तसेच खेळाच्या मैदानांचा विकास व क्रीडा साहित्य पुरवठा यावर ठोस कार्ययोजना राबविण्याचे आश्वासन दिले आहे.
महिला व ज्येष्ठ सक्षमीकरण- महिला बचतगटांसाठी व्यवसायिक प्रशिक्षण, बाजारपेठेची सोय व आर्थिक मदत, तर ज्येष्ठांसाठी विश्रांती केंद्र व आरोग्य तपासणी शिबिरे यांचा समावेश करण्यात आला आहे.
विधवा, अपंग, वृद्धांना शासनाच्या विविध योजनांचा घरपोच लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
गोरगरीबांसाठी गृहनिर्माण व सामाजिक न्याय – प्रभागातील पात्र नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजना मिळवून देण्यासाठी विशेष मदत केंद्र सुरू करण्याची घोषणा उमेदवारांनी केली. राशन, पेन्शन, आरोग्य-विमा योजनांची माहिती व अंमलबजावणीसाठी सल्ला व सहकार्य केंद्र उभारण्यात येणार आहे.
डिजिटल व लोकसहभागी प्रशासन – प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रभाग स्तरावर ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली सुरू केली जाईल.
तसेच प्रभाग विकास समिती स्थापन करून प्रत्येक कामात नागरिकांचा थेट सहभाग राहील, असे उमेदवारांनी सांगितले.
जनतेचा शब्द – जनतेसाठीच खर्च – या जाहीरनाम्याच्या घोषणेवेळी उमेदवारांनी सांगितले की,
> “राजकारण नव्हे – विकासकारण!
प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि प्रत्येक नागरिकाचा सन्मान — हीच आमची बांधिलकी.” काँग्रेस उमेदवारांकडून जाहीर झालेल्या या ठोस आणि लोकाभिमुख धोरणामुळे प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून,
काँग्रेसला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे.



