दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : मागील आठवड्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आळंदी शहराचा गावभेट दौरा केला होता. त्या पार्श्वभूमीवर आळंदीतील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण यांच्यासह आळंदी शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी व हभप महाराज मंडळींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, नितीन गोरे, अशोकराव भुजबळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, संभाजीराव श्रीरसाट, शिवसेना तालुकाप्रमुख राजुशेठ जवळेकर, संचालक विजयसिंह शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे, विशाल पोतले, ज्योतीताई अरगडे, महादेव लिंबोरे, मारुती सातकर, संदिप येळवंडे, योगेश पगडे, संदिप काचोळे, शंकरराव घेनंद, राहुल थोरवे, निखिल वर्पे, सचिन विरकर, रायबा साबळे, शिवाजीराव पगडे तसेच शिवसैनिक मोठ्या उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आळंदीतील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील रस्ते, इंद्रायणी प्रदूषण व सिद्धबेटातील विकास कामांमध्ये प्राधान्याने लक्ष घालणार असल्याचे सांगून सर्वांचे शिवसेनेत स्वागत आहे.
वारकरी संप्रदायातील संदीप महाराज नागरे (माऊली नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था), गौतमनाना महाराज बेलगांवकर, शंकरस्वामी महाराज, ज्ञानेश्वर महाराज गवळी (सावतामाळी वारकरी शिक्षण संस्था), योगेश महाराज खानझोडे (जगद्गुरू तुकोबाराय गुरुकुल), विश्वंभर महाराज वाळके (सिध्देश्वर बहुउद्देशीय संस्था), रावसाहेब महाराज ताठे, नितीन अर्जुन ननवरे (संत सावतामाळी सोशल फौंडेशन अध्यक्ष), अशोक भारत ननवरे, सागर भीमराव ननवरे, शशिकांत महादेव बाबर, साईनाथ किशोर ताम्हाणे, सचिन मोहन शिंदे (श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष), सौरभ बागल, चक्रधर गलधर, अशोक सालपे, राहुल रानमारे, उद्धव पोपळे, वैभव गलधर, आलाप खान, माउली घुंडरे, मयूर भांबरे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील, नितीन ननावरे, संतोष पाटील, भागवत गायकवाड, अस्लम शेख, हिरामण तळेकर, मयूर कुऱ्हाडे, मोहन तळेकर, गोविंद पाटील, शिवाजी आहेर, ज्ञानेश्वर चव्हाण, संतोष राठोड, हिरामण तळेकर, मयूर कुऱ्हाडे, मोहन तळेकर, गोविंद पाटील, शिवाजी आहेर, ज्ञानेश्वर चव्हाण, दीपक शेळके, रविंद्र जाधव, नवनाथ शिरसाट, नवनाथ भालेकर, घनश्याम कदम, भीमराव केकरे, सचिन शिंदे, पत्रकार सुनील बटवाल, बद्री नारायण घुगे इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.