शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
जुन्नर येथील आढावा बैठकीत आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ.प्रा.अशोक उईके यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
डॉ.उईके हे आदिवासी समाजातील पिएचडी झालेले उच्च विद्याविभूषित आदिवासी मंत्री असुन त्यांचे सोबत अत्यंत निंदनीय असे प्रकार घडत आहे.
सोनवणे या मग्रूर लोकप्रतिनीधींना आदिवासींच्या मतांची गरज आहे पण त्यांची किंमत नाही हेच स्पष्ट होते.याबाबत आदिवासी समुदायात तीव्र नाराजी पसरली असून सर्व स्तरातून टीका व निषेध केला जात आहे. असभ्य गैरवर्तनी शरद सोनवणे यांची आमदारकी रद्द करावी व अॕक्ट्रासिटी अॕक्ट कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी.
अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवाचे अध्यक्ष कुणाल कोवे, प्रदेश सचिव माजी जि.प.सदस्य तथा आदिवासी सेवक कुसुमताई अलाम,सुनिता उसेंडी, विनोद मडावी, रोहिणी उईके ,रुपेश सलामे, बादल मडावी यांनी मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
आदिवासी विकास मंत्र्यांचा अपमान म्हणजे संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान आहे.असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



