रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
कुरखेडा :- वन्य प्राण्यांची शिकार करीत मांस विक्री करणारा शिकारी बलवंतसिंग जालींदरसिंग रामगडे रा.जिरोबा वार्ड लाखांदूर जि.भंडारा याला त्याचा राहत्या घरी शिकारीचे साहित्य व वन्य प्राण्यांचे अवयव सह अटक करण्यात आली. सदर कार्यवाही कुरखेडा वनपरिक्षेत्र चमू द्वारे करण्यात आली.
कुरखेडा वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गेवर्धा जवळ दि.२३ जूलै रोजी गोपनीय माहीती वरून कुरखेडा वन विभागाच्या चमूने वडसा वरून कुरखेडाकडे येणाऱ्या अनिकेत दूलाराम बोगा रा.भूर्यालदंड ता.कोरची व यशवंत देवसाय मडावी रा. खूणेरा ता. कोरची या दोन आरोपी कडून ३३ कीलो रानटी डूकराचा मांस जप्त करीत त्याना अटक करण्यात आली होती.
त्यांना कूरखेडा न्यायालयात हजर करण्यात आल्यावर आरोपीना ५ दिवसाची वन कोठडी सूनावण्यात आली होती दरम्यान आरोपीचा बयाणावरून लाखांदूर येथील बलवंतसिंग जालींदरसिंग रामगडे याचा कडून सदर मांस खरेदी करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने कूरखेडा वन परिक्षेत्राच्या चमूने वन विभाग वडसा व लाखांदूर पोलीसांचा मदतीने मूख्य आरोपीला लाखांदूर येथून अटक केली.
यावेळी त्याचा घराची झडती घेण्यात आली तिथे शिकारीचे साहित्य तसेच रानटी डूकराचे तसेच अन्य वन्य प्राण्यांचे अवयव आढळून आले सदर शिकारी टोळीत एका पेक्षा अधिक सदस्य असण्याची शक्यता असल्याने त्या दिशेने वन विभागाचा तपास सूरू आहे.
सदर कार्यवाही वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक वरूण बि. आर. साहायक वनसंरक्षक रविन्द्र सूर्यवंशी यांचा मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) बी एच डिगोळे कूरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत गोपूलवाड वडसा वनपरिक्षेत्र अधिकारी कैलाश धोंडणे लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार कूरखेडा वन परिक्षेत्र साहायक संजय कंकलवार क्षेत्र साहायक बाबूराव तूलावी क्षेत्र साहायक बोरकर वनरक्षक एम. ई. सयाम,के. के. काशीवार, ए. एन. कूमरे, एम. के. दूधबळे, कू. जी. बी. आरेवार, व्ही. एन. हातमोडे,एस डब्ल्यू गोन्नाडे,कू.एन एस हिडामी, कू.सपना वालदे, कू.एम. डी. साठवने, वनरक्षक अहिर वाहन चालक जितेंद्र राऊत, विक्की गोबाडे यांच्या5 चमूने केली मागील सहा महिण्यात वन्य प्राण्यांचा शिकारी टोळी विरोधात वडसा वन विभागाची ही दूसरी कार्यवाही आहे.
यापूर्वी सूद्धा शिकारी टोळी विरोधात कार्यवाही करण्यात आली आहे वनविभागात कूठेही अशा प्रकारचा अवैध हालचाली आढळून आल्यास नागरीकानी वनविभागाला सूचित करीत सहकार्य करावे असे आवाहन वडसा वन विभागाचा वतीने करण्यात आले आहे.



