Home Vidarbha कास्ट्राईब व समता पॅनलची संयुक्त सभा…

कास्ट्राईब व समता पॅनलची संयुक्त सभा…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

        समता पॅनल व कास्ट्राईब शिक्षक संघटना दर्यापूर यांची संयुक्त सभा संजय नागे यांचे निवासस्थानी दि.29 जूनला पार पडली.

      गेले 20 वर्षापासून दर्यापूर शिक्षक सहकारी पतसंस्था दर्यापूर पतसंस्थेवर समता पॅनलच्या स्वच्छ व सभासदभिमुख कारभारामुळे पतसंस्थेकडे एक नामांकित वित्तीय संस्था म्हणून पाहिले जाते या पतसंस्थेच्या आगामी पदाधिकारी निवडी संदर्भात व पतसंस्थेमध्ये आतापर्यंत समता पॅनलने सभासद हिताचे घेतलेले निर्णय व स्वच्छ प्रशासनाला सहकार्य करण्याचे दृष्टीने कास्ट्राईब शिक्षक संघटना दर्यापूर ने या सभेमध्ये अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाला सहकार्याच्या दृष्टीने समता पॅनल मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. समता पॅनल कडे धम्मपाल गजभिये संचालक शिक्षक सहकारी पतसंस्था दर्यापूर यांच्यासह 9 संचालक आहेत.

          याप्रसंगी पंडितराव देशमुख, संजय साखरे, नरेंद्र जामनिक, पद्माकर खडे, गजाननराव मेहरे, स्वयंभ्रु नवरे, संजय नागे यांनी विचार मांडताना दोन्ही शिक्षक संघटना समविचारी असल्यामुळे एकत्र आल्याने आनंद व्यक्त केला.

          सभेचे संचालन राजेंद्र सावरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय नागे यांनी मानले. सभेला कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष पद्माकरराव खडे ,सरचिटणीस गजाननराव सोळंके, जेष्ठ मार्गदर्शक बाबुराव कुऱ्हाडे, दादाराव भोंगळे संचालक धम्मपाल गजभिये, स्वयंरूप नवरे, नरेंद्र जामनिक, प्रमोद डोंगरदिवे, विनोद जामनिक, बाळकृष्ण सोळंके तसेच समता पॅनलचे ज्येष्ठ मार्गदर्शक पंडितराव देशमुख जिल्हा कार्याध्यक्ष संजय साखरे अध्यक्ष सतिश वानखडे सरचिटणीस डि.आर. जामनिक कार्याध्यक्ष सुरेंद्र पतिंगे कोषाध्यक्ष राजेंद्र सावरकर ज्येष्ठ मार्गदर्शक विजय पवार, विलासराव पेठे, गजाननराव मेहरे ,संजय नागे, संचालक अशोकराव बावनेर, विनायकराव चव्हाण, गजाननराव गणोदे, प्रशांत गहले, सुनिल स्वर्गीय, प्रमोद कुरळकर, कैलास डहाळे, मंगेश ब्रम्हखेडे, इत्यादी कास्ट्राईब शिक्षक संघटना व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.