पारशिवनी तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोलितमारा येथे आज प्रवेश उत्सव व शिक्षक-विद्यार्थी-पालक मेळाव्याचे आयोजन..

 

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 पारशिवनी:- अदिवासी विकास प्रकल्प नागपूर अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोलित मारा येथे आज शाळेच्या पटागणात प्रवेश उत्सव व शिक्षक-विद्यार्थी-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

             कोलीतमारा येथील शैक्षणिक सत्र २०२३ – २४ ची सुरूवात शुक्रवार दि. ३० जून पासुन होत असल्याने नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांचे व पालकाचे स्वागत केले जाणार आहे.

              तसेच शाळेतील विविध उपक्रमा विषयी माहिती देण्याच्या हेतुने शाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावाचे आयोजन आज करण्यात आले आहे.

              मेळाव्याला दुपारी ठिक १२.०० वाजता सुरुवात होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक राजूभाऊ कुसुंबे शिक्षण सभापती जि.प.नागपूर हे असणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपक हेडाऊ

प्रकल्प अधिकारी ए.आ.वि. प्रकल्प नागपूर हे असणार आहेत. 

                  प्रमुख पाहुणे म्हणून शांताताई कुंभारे

जिल्हा सदस्य सदस्य,कलीरामजी उईके सरपंच ग्रा.पं.कोलितमारा,मीराबाई इडपाची उपसरपंच,विठ्ठल पाटील सोमकुवर सामाजिक कार्यकर्ता, कोलितमारा,श्रीमती शोभा चव्हाण- स.प्र.अ. (प्रशासन) नागपूर,श्रीमती मिना मेश्राम स.प्र.अ. (शिक्षण) नागपूर,सम्राट माटे- A.P.A. (अध्यापन) नागपूर,संदीप शेंडे – ए.एम (अध्यापन) नागपूर,सौ.उषाताई तुमडाम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,डॉ.भलावी वैद्यकीय अधिक्षक ग्रामिण रूग्णालय पारशिवनी,श्री.कैलास इवनाते- पालक प्रतिनिधी, घाटकुकडा,श्री.डॉ.खोब्रागडे वैद्यकीय अधिकारी प्राथमीक आरोग्य केन्द नवेगांव खैरी,आ.सरस्वतीबाई कोडवते माजी सभापती प.स. पारशिवनी,कु.प्रितीताई मडावी- सरपंच ढवळापूर ग्रा प.,धोंडाबाजी कंगाली माजी पोलीस पाटील कोलितमारा,मन्साराम उईके सामाजिक कार्यकर्ते,अंतुजी उईके ग्रामपंचायत सदस्य,कोलितमारा केशव आदमाची ग्रामपंचायत सदस्य तथा पालक प्रतिनिधी घाटपेंढरी,चव्हाण साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी कोलितमारा,श्री. प्रशांत लेले वनपरीक्षत्र अधिकारी नागलवाडी,बंडू उईके समन्वयक सातापुडा फाउंडेशन,श्रीमती वऱ्हाडे मॅडम संचालक किरण फाऊंडेशन,रामदासजी सोमकुवार सामाजिक कार्यकर्ते कोलितमारा,गजाननजी सोमकुवर सामाजिक कार्यकर्ते कोलितमारा हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

          कार्यक्रमाचे संयोजक श्री.एन.एल.भाकरे मुख्याध्यापक,ए.एस.चुट अधीक्षक तसेच समस्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी / विद्यार्थीनी, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोलीतमारा. तालुका पारशिवनी,”यांनी, विद्यार्थी व पालक वर्ग यांना वेळवर उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.