खल्लार येथील एटीएम सेवा पूर्ववत सुरु…

 

युवराज डोंगरे/खल्लार

दि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकेच्या सर्व एटीएम धारक ग्राहकांना सुचविण्यात आनंद होतो की खल्लार येथील मुख्य बाजार चौकात अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्राहकांच्या सेवेसाठी एटीएम मशिन सुरु केले होते. मात्र मागिल काही दिवसात सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले असल्याने जिल्हा बँकेच्या खल्लार येथील शाखेचे एटीएम बंद होते त्यामुळे ग्राहकांना असुविधा झाली होती. दि.29 एप्रिल पासून खल्लार येथील एटीएम सेवा पूर्ववत सुरू झालेली असून या सेवेचा सर्व बँकेच्या एटीएम धारक ग्राहकांनी लाभ घ्यावा असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी कळविले आहे.