राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस अरविंद रेवतकर करणार विलास वनकरच्या पुढील उपचारासाठी आर्थिक मदत… — उद्या होणार आर्थिक मदत.. — दखल न्यूज भारत सोबत बातचीत..

 

      दिक्षा कऱ्हाडे

मुख्य कार्यकारी संपादक

     प्रमोद राऊत

तालुका प्रतिनिधी चिमूर

         “तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी,असे हृदयस्पर्शी संबोधन संतशिरोमणी तुकाराम महाराज यांचे आहे.

       समाज मनाला जिवंत ठेवणारा अतिशय मुलभूत व महत्वपूर्ण विचार संतशिरोमणी तुकाराम महाराजांचा आहे हे आताच्या काळात सुध्दा लक्षात येते..

        संतशिरोमणी तुकाराम महाराजांचा व इतर संत-महापुरुषांच्या विचारांचा संवेदनशील प्रभाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस अरविंद रेवतकर यांच्यावर आहे.

        तद्वतच त्यांना प्रतिकुल व अनुकूल परिस्थितीचा दांडगा अनुभव आहे.म्हणूनच ते संवेदनशील मनाचे कर्तव्यदक्ष व्यक्तित्व असल्याचे वारंवार स्पष्ट होते आहे.

         गंभीर परिस्थितीतून स्वतःला क्रमण करताना आज ते वैचारिक वैभवशाली झालेत.

        तसे ते हृदयस्पर्शी जिवंत मनाचे आहेत.एक रुपया खिशात असतांना तो रुपया सुध्दा दान करण्यासाठी ते तत्पर असतात हेच त्यांच्या मनाचे मोठेपण व कुशल कर्माचे महान धैर्य आहे असे प्रतीत होते!

           विलास वनकरच्या प्रकृती संबधाने,” दखल न्यूज भारतला बातमी प्रकाशित होताच, जिल्हा महासचिव अरविंद रेवतकर यांनी त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत करणार असल्याचे दखल न्यूज भारत सोबत चर्चा करताना स्पष्ट केले व ते उद्या चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन आर्थिक मदत रुग्णाला करणार आहेत.

           कोण कुणाकडे रोजंदारीने कामावर होता यापेक्षा कठीण वेळ प्रसंगी कोण कोणाच्या मदतीला धावून जातो याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

           राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव अरविंद रेवतकर भिसी वासीयांसाठी भुषणावह ठरावे अशीच त्यांची कृती व सामाजिक कार्य आहे असे म्हणणे चुकीचे ठरणारे नाही…