एस. बी. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रदीप बोडके सर यांच्या निवासस्थानी माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांची सदिच्छा भेट…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

           पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील प्रदीप लालासो बोडके एस. बी. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सर यांच्या निवासस्थानी माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांची सदिच्छा भेट भेटी प्रसंगी प्रदीप बोडके कुटुंबाच्या वतीने सुभाष तात्या बोडके यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा हार देऊन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

            याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत आसताना म्हणाले की चालू वर्षी उसाला पहिली उचल 2700 (सत्तावीसशे) रुपये देण्यात आली तर ऊस गाळप करण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस राहणार नाही पुढील वर्षी आपण कारखान्या मार्फत 50 हार्डवेस्ट (ऊस तोडणी यंत्र) सभासदांना देण्यात येणार आहेत. चालू वर्षी ऊसतोड मजूर पळून गेलेली आहेत तरीपण आपण शेतकऱ्यांचा सर्वच ऊस गाळपासाठी आणाला जाईल अन्यथा कोणतीही आडचण येऊ देणार नाही. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भेटी प्रसंगी पिंपरी बुद्रुक येथे बोलत होते.

              सदिच्छा भेटी प्रसंगी उदयसिंह पाटील, लालासाहेब शिवाजी बोडके, प्रदीप बोडके सर, संदीप बोडके, विजय बोडके, तुषार बोडके, आबासाहेब बोडके, आशोक बोडके, सुनील बोडके, सौदागर काटकर, निलेश बोडके, राजेंद्र मगर, विठ्ठल घोगरे, आजिनाथ बोडके, हानुमंत सुतार, दिलीप बोडके , दिपक बोडके, आमोल बोडके, पांडुरंग बोडके, तुकाराम बोडके, युवराज बोडके,सुरेश बोडके,युवराज गायकवाड, आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.