महात्मा ज्योतिबा फुलेंना स्मृति दिना निमित्ताने वाहिली आदरांजली …

   कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान : – सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे थोर समाज सुधारक,समाज, प्रबोधक, विचारवंत, समाजसेवक, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा १३३ व्या स्मृति दिना निमित्य आदरांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव मस्के आणि मुख्य अतिथी जि.वाय.अवचट यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

          यावेळी आशिष घोरपडे,यश तेलुते,उदय पाटील यांनी महात्मा जोतीबा फुले यांच्या कार्याविषयी आणि जीवनाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

           त्यानंतर उपस्थितांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन दोन मिनिटे मौन पाळत आदरांजली अर्पण करण्यात आली.

       कार्यक्रमाचे सुत्र संचालन कृणाल कोल्हे यांनी केले,आभार प्रदर्शन बारई ग्रंथपाल यांनी मानले.

      या प्रसंगी आशिष घोरपडे,राहुल पारधी,सुमित घोरपडे,स्वप्निल भेलावे,अभिषेक निमजे,उदय पाटील,रवी वानखेडे,शुभम कावळे,आकाश गुप्ता,अंकित लाडेकर,यश तेलुते, रोशन तांडेकर सह आदि नागरिक उपस्थित होते.