ब्रेकिंग न्यूज… — वाघाच्या हल्यात विहिरगाव येथील गुराखी ठार.

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी

चिमूर :-

         तालुक्यातील पळसगांव (पिपर्डा) येथे दबा धरून बसलेल्या वाघाने एका गुराख्यावर हल्ला करून गुराखीला ठार केल्याची घटना आज घडली आहे. ही घटना पळसगाव वनपरिक्षेत्र मधील बेलारा येथे दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

          मधुकर जंगलू धाडसें ४९ वर्ष रा.विहिरगाव,असे मृतकाचे नाव आहे. पळसगाव वनपरिक्षेत्रातील विहिरगाव बेलारा पळसगाव या वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने परिसरात सफारी साठी पर्यटकांची पाहुले वळत असतात.

       रविवारी सकाळी १० वाजेदरम्यान मधुकर धाडसे हे आपल्या सहा गुराखी सोबत गावातील गुरे चारण्याची त्यांची पाळी असल्याने ते आपल्या ६ सहकाऱ्यांसह मन्सराम जीवतोडे यांच्या पडीत असलेल्या शेतात जनावरे चारणाऱ्या साठी गेले होते.गुराखी गुरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला.जनावरे हंबरु लागल्याने बाकी असलेल्या गुराखी यांनी धाडसे यांना आवाज दिला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांचा शोध घेतला असता नाल्याजवळ काही अंतरावर त्याचे फरकडत नेल्याच्या पाहुल खुणा आडल्याने त्या खुणा बघत बघत जात त्याचे प्रेत नाल्याजवळ मिळाले आहे.

           या हल्ल्यात मानेच्या खाली शरीराचा काही भाग हल्ला केल्याचे दिसून आले.वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. या आधी अनेक वेळा वाघाच्या हल्लात गुराखी जखमी झाले आहे.

           या घटनेमुळे विहिरगाव बेलारा या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

            वन परीक्षेत्र अधिकारी योगीता आत्राम यांनी वनविभागाचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालया चिमूर येथे नेण्यात आले आहे.