लाचखोर तलाठी व कोतवाल एसीबीच्या जाळ्यात…..

प्रितम जनबंधु

  संपादक 

 

 गोंदिया:– फेरफार करून शेतीच्या दस्तऐवजावर नाव नोंद करण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारणार्‍या तलाठी व कोतवाल या दोघांना गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

 

         प्राप्त माहितीनुसार मधुकर नकटू टेंभुर्णीकर (५५) असे लाचखोर तलाठीचे तर राकेश संपत वालदे (३८) असे कोतवालाचे नाव आहे. ही कारवाई २८ सप्टेंबर रोजी एसीबीच्या पथकाने केली.

             सवीस्तर वृत्त असे की, तक्रारदार शेतकरी महीला आहे. त्यांच्या पतीला ३ भाऊ व ४ विवाहित बहीणी आहेत. तक्रारदार यांच्या दिराचे लग्न झाले नसल्याने ते तक्रारदारांकडे वास्तव्यास होते. त्यांनी त्यांच्या आजारपणामुळे त्यांची गिधाडी येथील १ हेक्टर शेती तक्रारदार यांच्या नावे १५ नोव्हेंबर २०२२ रोजी गोरेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे दस्त क्रमांक १६७६ नुसार नोंदणी करुण दिले आहे. सद्यस्थितीत तक्रारादार यांच्या दिराचे मृत्यू झाले आहे. मृत्यूपत्रानुसार दिराचे नावे असलेली जमीन तक्रारदार यांचे नावाने फेरफारकरीता गत मार्च महिन्यात तलाठी टेंभुर्णीकर यांच्याकडे दिली होती. महिने लोटले असतानाही टेंभुर्णीकर याने फरफार केले नाही.

            फेरफार करण्यासाठी २० हजार रुपये लागणार असल्याचे तक्रारकर्त्या महिलेस टेंभुर्णीकर याने सांगीतले. तक्ररकर्त्या यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाच लुतपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 

             तक्रारीच्या अनुषंगाने गुरूवारी सापळा कारवाई केली. तडजोडीअंती आरोपी टेंभुर्णीकर याने १८ हजार रुपये कोतवाल वालदेच्या मार्फत लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. दोन्ही आरोपींविरूद्ध गोरेगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.