भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
अस्वलाचे हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना 28 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता चे दरम्यान वनपरिक्षेत्र उत्तर धानोरा अंतर्गत येत असलेल्या मुस्का येथील शेत शिवाराला लागून असलेल्या कंपार्टमेंट नंबर 622 मुस्का नियत क्षेत्र जंगलात घडली दामोदर चैतू गावडे 48 राहणार मुस्का असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार दामोदर हा सकाळी आपले बैल घेऊन शेताकडे चारायला नेला होता. त्यापैकी एक बैल जंगलात चे दिशेने गेला त्याला शोधण्याकरिता तो जंगलात गेला असता तेथे अस्वलाने त्याचे वर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचे डोके छाती डावा हात व पोटावर गंभीर जखमा झाल्या हल्ल्याचे वेळी तीन अस्वल असल्याचे सांगितले.
सदर शेतकऱ्याने कशीबशी अस्वलाचे हल्ल्यातून आपली सुटका केली व तो काही अंतर आल्यानंतर फोन लावून घरच्यांना माहिती दिली.
गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन त्याला गावी आणलेउपचाराकरिता धानोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने गडचिरोली येथे जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. परंतु त्याचे डोक्याला मार असल्याने योग्य उपचाराकरिता त्याला सायंकाळी नागपूर येथे रेफर करण्यात आले.
त्यांना वनविभागातर्फे आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे.मुस्काचे वनपाल श्रीकांत नवघडे यांनी जखमीं सोबत स्वतः हजर राहून उपचाराकरिता मदत केली.तसेच नागरिकांनी जंगलात जाताना सावधानता बाळगावी विनाकारण जंगलात भटकू नये असे आवाहन केले आहे.



