Home कृषी कृषी विभागाच्या पथकाने शेतशिवारात जाऊन केली पिकांची पाहणी… — खडसंगी मंडळ...

कृषी विभागाच्या पथकाने शेतशिवारात जाऊन केली पिकांची पाहणी… — खडसंगी मंडळ अधिकारी क्षेत्रातंर्गत सर्वे…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

      नुकत्याच झालेल्या अति पावसामुळे खडसंगी परिसरातील सोयाबीन पिकावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झालेला होता.

      आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांनी तात्काळ दखल घेत कृषी विभागाला सूचना दिल्या व कृषी विभाग तज्ञ यांना पाहणी करण्यासाठीची सूचना दिली. 

          आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या सुचनेनुसार आज २९ ऑगस्ट ला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतबांधावर जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली.

       कृषी विभागाने बोथली, आमडी,खापरी,भिवंकूड येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली असून रोग नियंत्रण,उपाय योजना वर मार्गदर्शन करीत पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.

         यावेळी माजी पंचायत समिती सभापती राजु पाटील झाडे,जिल्हा कृषी अधिक्षक तोटावर,आंनद निकेतन कृषी महाविद्यालय प्रा.जोगी, उपविभागीय कृषी अधिकारी हरिणखेडे मॅडम,ता.कूषी अधिकारी पुजारी,चव्हाण मॅडम, बोथली येथील पोलीस पाटील आनंद थुटे,उपसरपंच प्रशांत काटवटे व इतर गावातील शेतकरी उपस्थित होते अशी माहिती किसान भाजप आघाडी चे संयोजक एकनाथ थुटे यांनी दिली.