शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
ब्रम्हपुरी :- गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अति महत्वाचा शहर म्हणून ब्रम्हपुरी शहर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे.
या ब्रम्हपुरी शहराला आरमोरी रोडवर लागून असलेला रेल्वे फाटक मात्र दिवसेंदिवस लोकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील आणि परिसरातील नागरिकांना आरोग्य, शैक्षणिक,शासकीय कार्यालये, इतर नागरी सुविधासाठी नेहमी ब्रम्हपुरी शहर गाठावे लागते.
परंतू वारंवार पडणाऱ्या रेल्वे गेटमुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे व अनेक रुग्णांनी आपले जीव सुद्धा गमावले आहे.
त्यामुळे सदर रेल्वे गेटवर कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांनी चमू तैनात करण्यात यावी.
जेणेकरुन नागरिकांना दैनंदिन आणि वारंवार भेडसावणाऱ्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेल.



