Home Social आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

    जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भारतातील 12 गडकिल्ल्यांचा समावेश करणारे लोकनेते विकास पुरुष माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 30 जुलै रोजी भद्रावती शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

      दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता येथील किल्ला वार्डातील विठ्ठल मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

     तर लोकसेवा मंडळातर्फे येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महावि‌द्यालयाच्या सभागृहात दुपारी 04:00 वाजता शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व मिठाई वितरण करण्यात येणार आहे. 

       कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत गुंडावार यांनी केले आहे.