युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय,आसेगाव पूर्णा राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने कृषिरत्न, शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 127व्या जयंती निमित्त अतिथी व्याख्यान संपन्न झाले.
व्याख्यानाचे प्रमुख वक्तेपदी डॉ.भारत कल्याणकर उपस्थित होते.तर व्याख्यानाचे प्रमुख अतिथी डॉ. प्रविण सदार उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.रविंद्र इचे होते.
सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष काळे,आभार कु.सोनम आमझरे हिने केले. व्याख्यानमालेला प्रा.अतुल चऱ्हाटे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी रासेयो स्वयंसेवक,विध्यार्थी यांची उपस्थिती होती.



