Home Maharashtra कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या अध्यक्षपदी प्रकाश बन्सोड तर महासचिवपदी नंदू दडमल यांची...

कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या अध्यक्षपदी प्रकाश बन्सोड तर महासचिवपदी नंदू दडमल यांची निवड…

      सुधाकर दुधे 

सावली तालुका प्रतिनिधी 

           म.रा.कॉष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ सिंदेवाही ची सभा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सिंदेवाही येथे अरुण खराते सर जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सभेत विविध विषयांवर चर्चा करून शिक्षकांच्या विविध सेवाविषयक प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले.

       सदर सभेत तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी गठित करण्यासंदर्भाने चर्चा करून खालील प्रमाणे तालुका कार्यकारणी गठित करण्यात आली. अध्यक्ष प्रकाश बन्सोड,महासचीव नंदू दडमल, कार्याध्यक्ष धर्मेंद्र मेश्राम, उपाध्यक्ष मिथुन रामटेके, सहसचीव विनोद गेडाम, सहसचीव अनील कोडापे, कोषाध्यक्ष कालुराम चहांदे, मुख्य तालुका संघटक प्रशांत खोब्रागडे,महिला प्रमुख वैशाली कोवले, महिला उपाध्यक्ष छाया मेश्राम अशाप्रकारे कार्यकारणीतील महत्वाच्या पदांची निवड बहुमताने करण्यात आली.

         सभेला हेमचंद रायपुरे ज्येष्ठ सल्लागार व माननीय अरुण खराते जिल्हाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले..सर्व कार्यकारिणी ला तालुक्यात संघटनेच्या बळकटी साठी संगटन विस्तारासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

        सभेचे सूत्रसंचालन प्रशांत खोब्रागडे सर तर आभार प्रदर्शन विनायक वाघमारे सर यांनी मानले …..