मुख्य लढाई असते विचाराची ज्याला आपण वैचारिक लढाई असे म्हणतो. ही लढाई दोन प्रकारे लढली जाते, अहिंसेच्या मार्गाने आणि हिंसेच्या मार्गाने. ज्यांना जो मार्ग योग्य वाटतो तो मार्ग ते स्वीकारतात. आणि आयुष्यभर लढाई करीत असतात. यासाठी कुणी दृढ संकल्प करतात तर कोणी नकळत का होईना पण या लढाया लढत लढतच असतात खरे तर सज्जन आणि दुर्जनांच्या मधील ही लढाई आहे मानवी जीवनातील ही लढाई आहे.
या जगात स्वार्थी आणि निस्वार्थी अशा दोन प्रवृत्ती आहेत, आणि ह्या दोन प्रवृत्तीची माणसे पण आहेत. स्वार्थ आणि निस्वार्थ ह्या दोन प्रवृत्तींच्या मधील ही खरी लढाई आहे स्वार्थ तर सर्वांनाच असतो आणि तो निसर्गतःच आहे, याबरोबरच निस्वार्थ पण सर्वांमध्येच असतो आणि तोही निसर्गतःच आहे, परंतु यांचे प्रमाण कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे मानवी गरजा भागविण्यापुरता स्वार्थ हा सर्वांनाच मान्य आहे, परंतु मानवी गरजा भागल्यानंतर हिचा जो स्वार्थ आहे तो म्हणजे लोभ मोह म्हणजे अतिस्वार्थ अमर्याद स्वार्थ. मर्यादित स्वार्थ आणि अमर्यादित स्वार्थ असे स्वार्थाचे दोन प्रकार आहेत मर्यादित स्वार्थाचे लोक म्हणजे सज्जन लोक आणि अमर्यादित स्वार्थाचे लोक म्हणजे दुर्जन लोक होत
मानवी समाजामध्ये जे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार होत आहेत, अंधश्रद्धा आणि जातीयता आणि धर्मांधता जे लोक करीत आहेत ते लोक म्हणजे अति स्वार्थी लोक होत, स्वार्थापायी या सर्व गोष्टी प्रत्यक्ष आपल्या जीवनात आणतात. असे लोक म्हणजे दुर्जन लोक होत. याविरुद्ध अन्याय अत्याचार भ्रष्टाचार जे करीत नाहीत, तसेच अंधश्रद्धा पाळीत नाहीत जातीयता पाळीत नाहीत आणि धर्मांधता पाळत नाहीत, ते लोक सज्जन होत. आणि ह्या वाईट गोष्टी विरोधात गेलो प्रत्यक्ष प्रयत्न करतात किंवा लढाई करतात ते तर क्रांतिकारक म्हणायला पाहिजेत
या दुष्ट रूढी आणि परंपरा नष्ट करण्यासाठी अहिंसाच्या मार्गाने जाणारे लोक अनेक मार्गाने प्रबोधन करीत असतात, तर काही लोक जेव्हा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार होतो किंवा अंधश्रद्धा जातीयता आणि धर्मांधता याचे दुष्परिणाम घडतात तेव्हा प्रत्यक्ष कृती करणाऱ्या काही सज्जन व्यक्ती असतात, त्या संघर्ष करीत असतात, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ना निवेदन देणे, उपोषण धरणे सत्याग्रह असे आंदोलन करणे, मोर्चे काढणे असा संघर्ष करीत असतात. आणि हिंसेचा मार्ग पत्करणारे कार्यकर्ते क्रांतिकारक सज्जन व्यक्ती हातात शस्त्र घेऊन अन्याय अत्याचार भ्रष्टाचार करणाऱ्यांची डायरेक्ट हत्याच करीत असतात धर्मांधता जातीयता आणि अंधश्रद्धा पाळणाऱ्यांचा ते चांगलाच खरपूस समाचार घेतात म्हणून ह्या क्रांतिकारकांची वचक दुष्ट दुर्जन लोकांवर असते दुष्ट दुर्जन लोक अहिंसक लढाई करणाऱ्यांना दाद देत नाहीत, यांना भीत नाहीत, यांची बेपार्व करतात, मात्र हिंसक लढाई करणाऱ्यांकडे मात्र विशेष लक्ष देतात. त्यांची लढाई थांबविण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतात, त्यांच्याविरोधात पोलीस यंत्रणा पाहिजे तर मिलिटरी पण बोलावतात, पण आपली दुष्ट निधी आणि दुष्ट धोरण काही सोडत नाहीत, कारण ते दुष्ट असतात म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची ही माणसे असतात, ज्यांना समाज दुर्जन असे म्हणत असतो. त्यांच्या विरोधात लढाई करणाऱ्यांना समाज सज्जन म्हणत असतो
लढाई करणाऱ्या मध्ये सज्जन आणि दुर्जन असा फरक समाजानेच केलेला आहे. तरी पण जो समाज रुढीवादी परंपरावादी अंधश्रद्धावादी जातीवादी आणि धर्मांधवादी आहे, जो समाज अपरिवर्तनीय आहे म्हणजे त्याला परिवर्तन करायची इच्छा वाटत नाही, म्हणजेच जे स्थितीवादी आहेत, परिवर्तनवादी नाहीत अशी ज्ञानी लोक पण परिवर्तनवादी चळवळीला विरोध करतात, आणि जे अज्ञानी आहेत, ज्यांना हे अन्याय अत्याचार का होतात किंवा भ्रष्टाचार का करतात, किंवा अंधश्रद्धा म्हणजे काय त्या का पाळल्या जातात, जातीयता का निर्माण झाली धर्मांधता का निर्माण झाली, त्याची कारणे माहिती नसलेला अज्ञान अडाणी देव भोळा समाज या परिवर्तनाच्या लढाईपासून अलग राहत नाही, तर तो दुर्जन प्रवृत्तीच्या लोकांनाच मदत करत असतो याचे कारण म्हणजे जात आणि धर्म याबद्दल असलेली त्यांची श्रद्धा ( नव्हे अंधश्रद्धा ).
अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार या याची कारणे काय ? त्याचे मूळ काय? अंधश्रद्धा का निर्माण झाल्या आणि कोणी निर्माण केल्या? जात आणि धर्माची उत्पत्ती कशी झाली आणि त्यांचा उद्देश काय आहे? याबद्दलचे ज्ञान नसलेला समाज म्हणजे अज्ञानी समाज परिवर्तनाच्या या लढाईत प्रतिगामींनाच मदत करत असतो, पुरोगामींच्या विरोधात उभा असतो. हा सर्वसामान्य अज्ञानी अडाणी समाज, परिवर्तनाच्या या लढाईत एक तर अलिप्त राहतो किंवा दृष्ट दुर्जानानच मदत करतो. म्हणूनच परिवर्तन होत नाही किंवा क्रांती घडत नाही.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक : 27 डिसेंबर 2025. फोन : 9420912209.



