लोनवाहीत कृषि महाविद्यालय चे विद्यार्थिनींनी दीले चारा प्रक्रियेचे प्रात्यक्षिक…. — युरियाच्या वापरातून चारा पिकावर उपचार…

चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि

अमान क़ुरैशी

दखल न्यूज भारत

सिंदेवाही: 

 ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत सिंदेवाही तालुक्यात लोनवाही येथे चारा प्रक्रिये बद्दल प्रात्यक्षिकाचे सादरीकरण मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी युरियाच्या वापरातून चारा पिकावर उपचार केले आहेत. 

          याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना चारा उपचारा बद्दल माहिती दिली. उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईमुळे हिरवा चारा मिळत नाही. अशा वेळी जनावरांना वाळलेल्या चाऱ्यावर अवलंबून राहावे लागते. पशुपालक जनावरांच्या आहारात दुय्यम घटकांचा (उदा. गव्हाचा पेंढा, भात पेंढा) जास्त वापर करतात. त्यामुळे आहाराची पौष्टिकता वाढवण्यासाठी युरिया प्रक्रिया महत्त्वाची ठरते.

            युरियाच्या वापरातून चारा पिकावर उपचार करण्याच्या प्रात्यक्षिकात दोन लिटर पाण्यात २५० ग्रा. गूळ, ५० ग्रा. मीठ व १५० ग्रा. युरिया एकजीव करून पाच किलो वाळलेला चारा वर शिंपडून त्याचे मिश्रण केले आणि हा चारा २१ दिवसांनी गुरांना खायला देण्याचा सल्ला कृषी कन्यांनी प्राची वानखेडे,मोनिका किन्हेकर, मृण्मयी निमसटकर, अंकिता चंदनखेडे,श्वेता वासेकर यांनी सिंदेवाही लोनवाहीत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दिला आहे .हे प्रात्यक्षिक योग्य रीतीने पार पाडण्याकरीता मुल कृषी महाविद्यालयाचे कन्यांनी कार्यक्रम यावेळी हा उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे, अधिकारी डॉ खुशाल राठोड, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र या विषयाचे विषयतज्ञ यांची मार्गदर्शन व मदतिने केले. लोनवाही चे प्रगतिशील शेतकरी ओमप्रकाश बोरकर , दीपक बोरकर, व इतर गावकरी उपस्थित होते.

         B कार्यक्रम अधिकारी डॉ. खुशाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालय मुल चे कृषि कन्या प्राची वानखेडे,मोनिका किन्हेकर, मृण्मयी निमसटकर, अंकिता चंदनखेडे,श्वेता वासेकर यांनी चारा प्रक्रियेचे प्रात्यक्षिक केलेले आहेत.