उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर : – तालुक्यातील भिसी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून,काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असतय.आता तर या आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालय म्हणून मंजूरी मिळाली आहे.
यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी अतिदक्ष राहात रुग्णांची सेवा काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
मात्र भिसी आरोग्य केंद्रातील व आता मान्यता मिळालेल्या ग्रामीण रुग्णालयातील दोन्ही डॉक्टर हे नियमित सेवेत राहात नसून आळीपाळीने फक्त ३-३ दिवसच रुग्णांना सेवा देत असल्याच्या धक्कादायक व तितकाच गंभीर प्रकार नरवडे ग्लोबल हुमन असोसिएशन राईट्सचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पंकज गायकवाड यांनी उघड केले आहे.
भिसी येथील लोकसंख्या जवळपास १५ हजार च्या आसपास आहे आणि रुग्णालयातंर्गत २५ हजार असावी असे वाटते आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.हे दोन्ही वैद्यकीय अधिकारी तीन – तीन दिवसाच्या ड्युटी करून बाकी दिवस गावाला जात असतात असा आरोप नरवडे ग्लोबल ह्युमन असोसिएशनचे राइट्सचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पंकज गायकवाड यांनी केला आहे.
वेळेत एखादी वैद्यकीय अधिकारी गैरहजर असले की,सामुदायिक आरोग्य अधिकारी यांना हाताशी धरून ओपीडी काढायचे सांगून गैरहजर असतात.या प्राथमिक आरोग्य केंद्रात काही आरोग्य कर्मचारी सुद्धा कोणतेही सुट्टीचे अर्ज न देता गैरहजर असतात असाही आरोप त्यांनी केला आहे.
याच बरोबर मागील दोन वर्षापासून दोन नियमित असलेल्या आरोग्य सेविका ओपीडीवर कार्यरत होत्या.मात्र यात १५ दिवसाच्या ड्युटी करून १५ दिवस विना अर्जाने सुट्टीवर जात असतात याला वैद्यकीय अधिकारी यांची मूकसंमती राहत होती असे पंकज गायकवाड यांचे म्हणणे आहे.
गैरहजर राहात असलेल्या या आरोग्य सेविकांचे पगार मात्र पूर्ण महिन्याचे काढले जात होते.या सर्व कारभारावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे.
दिनांक २७ जून शुक्रवारी भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात पंकज गायकवाड सायंकाळी ४ : ०० वाजता उपचारासाठी गेले असता भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसून सामुदायिक आरोग्य अधिकारी चितावार या ओपीडी काढत असताना त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांना वैद्यकीय अधिकारी कुठ गेले? असे विचारताच तिचे पतीच समोर बोलायला लागले.प्रश्न हा पडतो की बायकोची ड्यूटी असताना नवऱ्याचे रुग्णालयात रुग्णांना बोलायचे काय काम असते?…
त्याच वेळी स्वतः पंकज गायकवाड हे औषधी घेण्यासाठी गेले तर तिथे औषध निर्माते हे सुद्धा गैरहजर दिसून आले.याबाबत आरोग्य कर्मचारी यांना विचारणा केली असता कोणीच उत्तर द्यायला तयार नव्हते.
सदर घटनाक्रमाची तालुका वैद्यकीय अधिकारी यांना फोन करून माहिती सांगितली असता त्यांनी सुद्धा उडवाउडवीची उत्तरे दिली.याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांना भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी विना अर्जाने गैरहजर असतात याबाबत अनेकदा तोंडी सांगितले होते.मात्र चौकशी करून सांगतो असे वरिष्ठ अधिकारी वेळ मारून नेत असतात..
अशा कामचुकार करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यावर ठोस कारवाई जिल्हा आरोग्याधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे कडून केली जात नाही हे चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत बेजबाबदार वास्तव्याचे दर्शन आहे.
भिसी आरोग्य केंद्रातंर्गत अशा कामचुकार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर व आरोग्य अधिकाऱ्यांवर जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कारवाई केली नाही तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात जाऊन आंदोलन करू असा इशारा नरवडे ग्लोबल ह्युमन राइट्स असोसिएशनचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तथा संविधान रक्षक दलाचे चिमूर शहर अध्यक्ष पंकज गायकवाड यांनी दिला आहे.
मागील दोन वर्षापासून गैरहजर असलेल्या व १५- १५ दिवस विना अर्जाने गैरहजर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केली पाहिजे आणि शासनाची डोळेझाक करून दिशाभूल करणाऱ्या आरोग्य कर्मच्यावर कारवाई करून तत्काळ त्यांना निलंबित केलेच पाहिजे असेही पंकज गायकवाड यांनी प्रतिनिधींना माहिती दिले आहे….
भिसी आरोग्य केंद्रात डॉक्टर ३-३ दिवस आळीपाळीने गायब राहात असतांना अधिकारी,पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक संघटनाचे पदाधिकारी,नागरिक चूप राहतातच कसे? हेच कळायला मार्ग नाही….



