Home Social सहज सुचलं कलाकुंजच्या मुख्य संयोजिकापदी चंद्रपूरच्या वास्तुविशारद शिवानी झाडे तर सहसंयोजिकापदी किनवटच्या...

सहज सुचलं कलाकुंजच्या मुख्य संयोजिकापदी चंद्रपूरच्या वास्तुविशारद शिवानी झाडे तर सहसंयोजिकापदी किनवटच्या रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरेंची नियुक्ती!.. 

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

     महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं कलाकुंज व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिकापदी चंद्रपूरच्या सुपरिचित वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे यांची नियुक्ती करण्यात आली तर याच गृपच्या सहसंयोजिकापदी किनवटच्या प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे यांची निवड करण्यात आली आहे.

       ह्या दोन्ही पदांच्या नियुक्त्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या मायाताई कोसरे,अधिवक्ता मेघा धोटे, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, शैला चिमड्यालवार जेष्ठ साहित्यिक विजया भांगे, रजनी रणदिवे यांनी केल्या आहेत.

        दरम्यान कलाकुंजच्या संयोजिकापदी झाडे व सहसंयोजिकापदी वाडगूरे यांची निवड झाल्याबद्दल सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार,गायिका रश्मि हिवरे, समाजसेविका चंदा कामडी, समता बन्सोड, विद्या पिंजरकर, प्रियंका बेन्द्रे, प्रियंका गायकवाड, प्रांजू मखरे, अंजली इटनकर वैजयंती गहुकर,अधिवक्ता अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, विजया तत्वादी, कविता दिकोंडवार, कविता जुमडे,चैताली आतराम,सरोज हिवरे, प्रा.सुनंदा पाटील, प्रा.वैशाली राऊत ,सुकेशिनी टेभूर्णें,स्नेहा मडावी, मनिषा मडावी, सुवर्णा लोखंडे,आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.