Home Vidarbha वाहनांच्या लिलावाच्या तारखेत बदल… 

वाहनांच्या लिलावाच्या तारखेत बदल… 

युवराज डोंगरे

   उपसंपादक 

       पोलिस स्टेशन खल्लार येथे 15 दुचाकी व 1ऑटो असे 16 वाहने बऱ्याच वर्षापासून बेवारस व क्षतीग्रस्त अवस्थेत पडून आहेत आजपर्यंत या वाहनांवर कुणीही मालकी हक्क सांगितला नाही. 

        बेवारस असलेल्या या 16 वाहनांचा लिलाव उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, दर्यापूर यांच्या आदेशानुसार दि 29 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता जाहीर लिलाव करण्यात येणार होता.

       परंतु दि 29 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी यांची वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत महत्वाची बैठक असल्याने दि 29 एप्रिल रोजी होणारा बेवारस वाहनांचा लिलाव हा दि 30 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती खल्लारचे ठाणेदार रविंद्र बारड यांनी दिली असून लिलावात सहभाग घेणाऱ्या नागरिकांनी सदर बदल लक्षात घ्यावा.