दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादक
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास झाला आहे.या भीषण अपघातात अजितदादा पवार यांचा मृत्यू झाला आहे.त्यांच्याबरोबर इतर सहा जनांचा या अपघातात दु:खद् मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अजीतदादा पवार हे रोखठोक बोलणारे खुले व्यक्तीमत्व होते.त्यांना राजकीय क्षेत्रासह सामाजिक व इतर क्षेत्राचा दांडगा अनुभव होता.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांची व राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातील विपरीत हानी झाली असून,ती पोकळी भरून निघणे कठीण आहे.
त्यांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी महाराष्ट्र राज्यासह देशात वाऱ्यासारखी पोहोचताच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी व महाराष्ट्र राज्यातील जनतेंनी आपल्या भावना मोकळ्या करुन सहृदयसंवेदना व्यक्त केल्यात.


