निरा नरशिंहपुर गावच्या उपसरपंच पदी गुरुदत्त विठ्ठल गोसावी यांची बिनविरोध निवड… — लक्ष्मी नरसिंहाचा आशीर्वाद पाठीशी ठेवुन गोर गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहील उपसरपंच गुरुदत्त गोसावी यांचे निवडी प्रसंगी उद्गार..

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          निरा नरशिंहपुर तालुका इंदापूर येथील ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी गुरुदत्त गोसावी यांची बिनविरोध निवड झाली.

         नरसिंहपूरचे विद्यमान सरपंच अर्चना नितीन सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड घेण्यात आली.

          निवडीप्रसंगी उपसरपंच गुरुदत्त गोसावी बोलत आसताना म्हणाले की श्री लक्ष्मी नरसिंहाचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे व नरसिंहपूर गावाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच मी नरशिंहपुर गावचा उपसरपंच झालो,याचा मला आज आनंद होत आहे. 

            तसेच गावच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन गावचा विकास इथुन पुढे जोमाने करूया व गोर गरिबांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझे नेहमीच प्रयत्न राहतील,असे उद्गार उपसरपंच गुरुदत्त गोसावी यांनी निवडी प्रसंगी काढले.

               नरशिंहपुर गावच्या उपसरपंच पदावर गुरुदत्त विठ्ठल गोसावी यांनी पदभार घेतला.ग्रामपंचायत नरशिंहपुर येथील उपसरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक झाली. त्या ठिकाणी उपसरपंच म्हणून गुरुदत्त गोसावी यांची बिनविरोधी निवड झाली.

            माजी उपसरपंच रेणुका आनंद काकडे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर सर्व ग्रामपंचायत सदस्याच्या उपस्थितीत उपसरपंच म्हणून गुरुदत्त गोसावी यांची बिन विरोध निवड झाली.

            सदर निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक महेश संभाजी मेत्रे,यांनी कामकाज पाहिले.या निवडणुकीसाठी विद्यमान सरपंच अर्चना नितीन सरवदे,माजी सरपंच अश्विनी चंद्रकांत सरवदे,माजी उपसरपंच विठ्ठल ज्ञानदेव देशमुख,माजी उपसरपंच रेणुका आनंद काकडे,ग्रामपंचायत सदस्य,सुनील भीमराव मोहिते,गुरुदत्त विठ्ठल गोसावी,जयश्री दशरथ राऊत,रूपाली उमेश कोळी,ग्रामसेवक महेश संभाजी मेत्रे,उमाकांत लक्ष्मण केसकर,या सर्वांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पाडण्यात आली.

             निवडीनंतर प्रमुख उपस्थिती नरसिंहपुर गावचा जाणता राजा मा. सरपंच नरहारी काळे,सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे,माजी सरपंच आण्णासाहेब काळे,माजी सरपंच विलास ताटे,माजी सरपंच संतोष मोरे, माजी सरपंच हानुमंत काळे,माजी सरपंच जगदीश सुतार,माजी उपसरपंच आनंद काकडे,माजी सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे,माजी सरपंच अश्विनी सरवदे,उद्योजक विजय सरवदे,तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राऊत,नाथाजी मोहिते,अतुल घोगरे,सतीश काकडे,उमेश घोडके,सचिन कदम,धनंजय पवार,संदीप मोहिते,रोहित जगदाळे,माया घोडके,मंगेश ताटे,प्रतीक गोसावी,आधी ग्रामस्थ व गावातील आजी-माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         उपसरपंच पदाच्या निवडणुकी नंतर गुरुदत्त गोसावी,यांचा सन्मान ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला.तसेच माजी सरपंच रेणुका आनंद काकडे यांचा देखील सन्मान करण्यात आला.