दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादीका
भारतात गल्लीपासून दिल्लीपर्यंत निर्माण झालेल्या बेबंद शाहीला ईव्हीएमच जबाबदार आहे.या मह मोर्चातून ईव्हीएम हटवण्याचा एल्गार झाला पाहिजे.
म्हणूनच सर्व समविचारी पक्ष व सामाजिक संघटनांच्या द्वारे १ नोव्हेंबर २०२५,ला मुंबईत महामोर्चा होणार आहे.
1 नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात निघणाऱ्या महामोर्चा मध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जर ईव्हीएम हटवलं नाही तर ते उघडून फेकण्याचा निर्धार एकमताने झाला पाहिजे.त्यासाठी निवडणूक आयोगावर मोठा दबाव निर्माण केला गेला पाहिजे असे महामोर्चा आयोजकांचे व करोडो मतदारांचे मत आहे.
मतदार राजा ईव्हीएम मशीन नाकारत असेल तर सरकार आणि निवडणूक आयोग जबरदस्ती का करत आहे?हा प्रश्न मतदारांच्या द्वारे उपस्थित केला जात आहे.
सर्व गोष्टींच्या बाबतीत स्वदेशी वापरा,स्वदेशी वापराचा नारा देणारे लोक विदेशी ईव्हीएम मशीनचा आग्रह का बर धरतात?आपल्या सोयीनुसार गडबड गोंधळ करण्यासाठीच ना?येथे स्वदेशी बॅलेट पेपर मतपत्रिका का नको?
कारण त्यांना माहिती आहे जर आपल्याला गडबड गोंधळ करून जिंकून यायच असेल थोडक्यात अल्पसंख्याकांना बहुसंख्य लोकांवर राज करायच असेल तर ईव्हीएम मशीनच पाहिजे.म्हणून सर्वप्रथम एक होऊन ही ईव्हीएम मशीन हद्दपार केली पाहिजे..
मतचोरीचे खरं मूळ ईव्हीएम मशीन आहे.ईव्हीएम मशीन तुमच मतदान चोरी करुन तुमच्या खऱ्या प्रतिनिधित्वाची हत्या करत आहेत.
त्यामुळे पारदर्शक व निष्पक्षपाती मतदान होत नाही व नको असलेली माणसं भारत देशातील नागरिकांच्या मानगुटावर बसतात.
बाकी इतर मुद्दे जसे की मतदार यादीतील घोळ,बोगस मतदार,मतदाराला दिली जाणारी आमिषे,पैसा,दारू,मटन हे सुद्धा आहेतच.परंतु खरं मूळ इव्हीएमच आहे.प्रथम ते उखडून फेकण्यासाठी राजकीय पक्षांच्या व सामाजिक संघटनांच्या प्रमुखांनी,पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि सुज्ञ व जाणकार मतदारांनी रणनीती तयार केली पाहिजे..
ईव्हीएम मशीन जर हाटवली तर आज सरकार आणि सत्तेत दिसणारे चेहरे उद्या रोडवर दिसतील आणि रोडवर दिसणारे चेहरे सरकार आणि सत्तेत बसलेले दिसतील असे महामोर्चा आयोजकांचे म्हणणे आहे.


