उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
माजी सरपंच निलकंठ भुरे हे काल ४ वाजताच्या दरम्यान स्वतःच्या शेतावर गेले असता,शेतातच पट्टेदार वाघानी त्यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची दुःखदायक घटना सिवरा परिसरातील शेतशिवारात घडली.
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात वाघाची दहशत जिकडे तिकडे वाढली असून वाघ कुठे कुणाला ठार करेल याची शाश्वती राहीली नाही.
माजी सरपंच निलकंठ त्र्यंबक भुरे हे काल सायंकाळी घरी परत आले नसल्याने कुटुंबातील सदस्यांनी शेतावर जाऊन शोध घेतला असता ते वाघाचे बळी ठरले असल्याचे लक्षात आले.मृत्यू समयी त्यांचे वय ६० वर्ष होते.एक जाणकार,समजदार,शांत,मृदू भाषी व्यक्तिमत्त्व असलेले निलंकंठ भुरे हे वाघाच्या हल्ल्यात मृत्यु व्हावे,ही घटनाच हृदयद्रावक ठरली आहे.
वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असता चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर व इतर वनपाल,वनरक्षक आणि भिसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर स्थळ पंचनामा केला आणि शवविच्छेदन करण्यासाठी शव चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
वन विभाग वाघा द्वारे चिमूर तालुक्यातील अजून किती नागरिकांचा व पाळीव प्राण्यांचा बळी घेणार? बळी घेणारा प्रकार नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या संतापाचा आणि उद्रेकाचा भाग ठरु नये…
मात्र,स्थानिक आमदार किर्तीकुमार भांगडीया हे वाघांपासून नागरिकांचे व पाळीव प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी अपयशी ठरत असल्याने ते मुंबईत बसून करतात तरी काय? हा प्रश्न चिमूर तालुक्यातील नागरिकांचे ठोके ठणकावणारा आहे.


