व्हाईस ऑफ मीडियातर्फे एक दिवशीय धरणे आंदोलन उद्याला….

 

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली: व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांच्या प्रश्नांवर २८ ऑगस्टला येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. विविध ९ मागण्यांसाठी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे आंदोलन होणार आहे. 

                दहा वर्षांपासून पत्रकारिता करणाऱ्यांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे. राज्याच्या माहिती महासंचालनालयाने चे पोर्टल तयार करून पदवी पूर्ण केलेल्या व पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे.

                 राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिक यांना जाहिराती देताना सातत्याने डावलले जात आहे.हे प्रकार थांबून त्यांना जाहिराती देण्यात याव्यात,. सर्वांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष तातडीने तयार करावेत, तसा शासन निर्णय काढावा. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. त्या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकार, त्यांच्या पाल्यांना व्यवसायासाठी मदत करण्यात यावी.माहिती महासंचालनालय यांच्या वतीने सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहित करणारे पुरस्कार गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत, ते देण्यात यावे.

             मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन २० हजार रुपये करू, अशी घोषणा केली होती. टीव्ही, रेडियो आणि सोशल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली. या दोन विषयांचा शासनआदेश तातडीने काढावा, अधिस्वीकृती कार्ड आणि सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन याबाबत असणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, सर्व ठिकाणी वेगाने वाढणाऱ्या आणि भविष्यात पत्रकारितेची नांदी असणाऱ्या सोशल मीडिया पत्रकारितेसाठी तातडीने जाहिरातीबाबत धोरण ठरवावे, सोशल मीडियांनाही जाहिराती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, ज्यांनी पत्रकारितेत किमान दोन वर्ष पूर्ण केली आहेत. अशा प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमा सुरक्षा कवच देण्यासंबंधीच्या सूचना प्रत्येक नोंदणी असलेल्या माध्यमाच्या मालकांना देण्यात याव्यात.

            सरकार आणि राज्य कामगार विभाग यांना या सूचनांचे पालन काटेकोर करण्याबाबत मार्गदर्शिका द्यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. यावेळीपत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांनी केले आहे. .