Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — दोन वैद्यकीय अधिकारी असताना सामुदायिक आरोग्य अधिकारी काढतो...

ब्रेकिंग न्यूज… — दोन वैद्यकीय अधिकारी असताना सामुदायिक आरोग्य अधिकारी काढतो ओपीडी…  — सामुदायिक आरोग्य अधिकारी चा नवराच रुग्णांना सांगतो कायदे! — सामाजिक कार्यकर्ते पंकज गायकवाड यांचा आरोप…

शुभम गजभिये.. 

  विशेष प्रतिनिधी… 

      चिमूर तालुक्यातील भिसी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून,आता या आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालय म्हणून मंजूरी मिळाली आहे. 

        भिसी येथील लोकसंख्या जवळपास १५ हजार च्या आसपास आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.हे दोन्ही वैद्यकीय अधिकारी तीन तीन दिवसाच्या ड्युटी करून बाकी दिवस गावाला जात असतात असा आरोप नरवडे ग्लोबल ह्युमन राइट्स चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पंकज गायकवाड यांनी केला आहे. 

        वेळेत एखादी वैद्यकीय अधिकारी गैरहजर असले की,सामुदायिक आरोग्य अधिकारी यांना हाताशी धरून ओपीडी काढायचे सांगून गैरहजर असतात.या प्राथमिक आरोग्य केंद्रात काही आरोग्य कर्मचारी सुद्धा कोणतेही सुट्टीचे अर्ज न देता गैरहजर असतात असाही आरोप त्यांनी केला आहे.

       याचबरोबर मागील दोन वर्षापासून दोन नियमित असलेल्या आरोग्य सेविका ओपीडीवर कार्यरत होत्या.मात्र यात १५ दिवसाच्या ड्युटी करून १५ दिवस विना अर्जाने सुट्टीवर जात असत.याला वैद्यकीय अधिकारी यांची मूकसंमती राहत होती. 

        मात्र या आरोग्य सेविकांचे पगार मात्र पूर्ण महिन्याचे काढले जात होते.या सर्व कारभारावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.

           आज भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात पंकज गायकवाड सायंकाळी ४ वाजता उपचारासाठी गेलो असता भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसून सामुदायिक आरोग्य अधिकारी चितावार या ओपीडी काढत असताना त्यांच्या निदर्शनास आले.

       त्यांना वैद्यकीय अधिकारी कुठ गेले?असे विचारताच तिचे पतीच समोर बोलायला लागले.बायकोची ड्यूटी असताना मग नवऱ्याच काय काम असते?असा प्रश्न मला निर्माण झाला.

        त्यानंतर औषधी घेण्यासाठी गेलो तर तिथे पण औषध निर्माते हे गैरहजर दिसून आले.याबाबत आरोग्य कर्मचारी यांना विचारणा केली असता कोणीच उत्तर द्यायला तयार नव्हते.

       त्यामुळं तालुका वैद्यकीय अधिकारी यांना फोन करून माहिती सांगितली असता त्यांनी सुद्धा उडवाउडवीची उत्तरे दिली.याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांना भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी विना अर्जाने गैरहजर असतात याबाबत अनेकदा तोंडी सांगितले मात्र चौकशी करून सांगतो असे वरिष्ठ अधिकारी वेळ मारून नेत असतात..

        मात्र अशा कामचुकार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यावर ठोस कारवाई जिल्हा आरोग्याधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे कडून केली जात नाही.या दोन दिवसात अशा कामचुकार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कारवाई केली नाही तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात जाऊन आंदोलन करू असा इशारा नरवडे ग्लोबल ह्युमन राइट्स असोसिएशनचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तथा संविधान रक्षक दलाचे चिमूर शहर अध्यक्ष पंकज गायकवाड यांनी दिला आहे. 

       मागील दोन वर्षापासून गैरहजर असलेल्या व १५- १५ दिवस विना अर्जाने गैरहजर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केली पाहिजे आणि शासनाची डोळेझाक करून दिशाभूल करणाऱ्या आरोग्य कर्मच्यावर कारवाई करून तत्काळ त्यांना निलंबित करावे असेही पंकज गायकवाड म्हणाले.