खल्लार येथे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन…

 

युवराज डोंगरे/खल्लार 

  उपसंपादक

 खल्लार येथे आज (२७)जुनला तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

                 भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्घाटन दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांच्याहस्ते पार पडले तर प्रमुख अतिथी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकर भारसाकळे,जि.प.चे माजी वित्त व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर,कृषि उत्पन्न बाजार समीतीचे उपसभापती तथा सांगवा बु.चे सरपंच राजु कराळे,खल्लारचे सरपंच योगेश मोपारी,उपसरपंच सौ.पुजाताई खंडारे यांच्यासह खल्लार ग्रा पं चे सदस्य,तलाठी एस.जे.वसु,हर्ष लोखंडे,गावातील  नागरिक उपस्थित होते.

                खल्लार येथे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे कार्यालय हे ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये होते.त्यांचे स्वतःचे कार्यालय नव्हते.तलाठी व मंडळ अधिकारी यांचे कार्यालय हे आता स्वतंत्र व स्वतःच्या जागेत उभे राहणार असुन यासाठी ३१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.