टेकाडी काॅलोनी येथे घराचे दुसऱ्या मजल्यावर मचान बांधताना प्लाय वरून पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू…  — पोलिसात गुन्हा दाखल.

   कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

 कन्हान : टेकाडी कालोनी येथे घराच्या दुसऱ्या मजल्या वरून पडून जखमी झालेल्या मजूरांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.मृतक मजुरांचे दिनेश दिवाकर राऊत (वय 32, रा. पिपरी (कन्हान) असे नाव आहे.

           दिनेश राऊत हा शनिवारी,२५ मे रोजी सकाळी ९ वाजता जवळील टेकाडी कॉलनीतील खदान क्रमांक 3 मध्ये राहणारे धर्मेंद्र वर्मा ठेकेदार यांच्या कामावर जायचे. 

        टेकाडी काॅलोनी उत्तरेस तिन किलोमिटर अंतरावर असून सदरे आलम यांचे घराच्या दुसऱ्या मजल्यावर काम करीत होते.सदरे आलम याचे दुसऱ्या मजल्यावर मचान बांधताना प्लाय वरून पाय घसरल्यामुळे दिनेश राऊत हे खाली पडला.मजुर रोहित राऊत ने त्याला वेकोलिच्या जेएन हॉस्पिटलमध्ये नेले.प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी दिनेशला कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले.तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

       मृताची पत्नी माधुरी दिनेश राऊत (29 वर्षे) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग क्रमांक २८/२४ अन्वया कलम १७४ जा.फौ.अन्वये गुन्हा दाखल केला असून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.