दर्यापूर तालुक्यात बियाण्याची कृत्रिम टंचाई,येवदयात शेतकरी आक्रमक,पोलिसात तक्रार दाखल…

 युवराज डोंगरे 

    उपसंपादक 

दर्यापूर तालुक्यातील विविध ठिकाणी बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. यावरून आक्रमक होत दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील शेकडो शेतकऱ्यांनी येवदा पोलिस स्टेशनवर धडक देत कृषी केंद्रचालक व अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आठवड्याभरात यावर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी दिला.

      दर्यापूर तालुक्यातील विविध कृषी केंद्रांवर बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. कृषी विभागाकडे या संदर्भात तक्रारी करून देखील कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत येवद्यातील शेकडो शेतकऱ्यांनी याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

            आठवड्याभरात कृषी केंद्र चालक व कृषी विभागाचे अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे. नाहीतर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे.

            यावेळी मयूर वांदे , पंकज कान्हेरकर,विशाल गायगोले, अक्षय तिडके, चेतन तिडके, हरीश मानकर,नरेंद्र मानकर, गोपाल मामनकर,विकास तिडके,हरीश डोळे, विलास भालतडक, सतीश टोलमारे,सचिन भालतडक,गोपाल चोरे,पंकज देशमुख, श्रेयश बोरोळे,उमेश वांदे, नागेश चोरे, बाळकृष्ण भालतडक, नरेंद्र वांदे, दिनेश दळवी, मनोज वंजारे,शाम काकड, योगेश वांदे, विनोद निमकार, देवेंद्र लायळे,शरद डहाके, सागर हरसुले, ज्ञानपाल राऊत,संतोष भालतडक आदी शेतकारी उपस्थित होते.