गाडेघाट वेकोली कामठी डंम्पींगतुन कोळसा,लोखंड चोरुन नेणारे ५ आरोपी पोलीसांच्या ताब्यात. — वाहन,लोखंडी साहित्य सह १ लाख २४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त… — वेकोलि अधिकारी व कन्हान पोलीसांची संयुक्त कारवाई…

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गाडेघाट रोड कामठी डंम्पींग येथून कोळसा आणि लोखंडी साहित्य चोरुन नेणाऱ्या पाच आरोपींना कन्हान पोलीसांनी अटक केली.

         वेकोलि डब्लुसीएल अधिकारी कर्मचाऱ्यांनी पकडुन त्याचा जवळुन एकुण १ लाख २४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

         प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.२६) मे ला सकाळी ११ वाजता वेकोलि कामठी उपक्षेत्र डब्लुसीएल सुरक्षा अधिकारी संतोष इंद्रासन यादव वय ३९ रा.खदान यांना माहिती मिळाली कि गाडेघाट रोड कामठी डंम्पींग येथुन काही युवक कोळसा आणि लोखंडी साहित्य चोरुन घेऊन जात आहे.

         अश्या माहिती वरुन सुरक्षा अधिकारी संतोष यादव यांनी घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली.वेकोली डब्लुसीएल अधिकारी,कर्मचाऱ्यांनी व कन्हान पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता काही युवक कोळसा आणि लोखंडी साहित्य चोरुन नेतांना मिळुन आले.

       वेकोली अधिकाऱ्यांनी व पोलीसांनी परिचय देऊन आरोपींना नाव विचारले असता त्यांनी आपले नाव १) शोहन छोटेलाल बाथब (वय ३३) , २) सर्वण सत्यनारायण यादव (वय २४) दोन्ही रा.खदान , ३) सुरज विठ्ठलराव वानखेडे (वय ३५) , ४) पप्पु तिर्थानंद (नागपुरे वय २९ ) , ५) रोहित बाबुलाल कांबळे , (वय १८) तीघे ही रा. धरम नगर कन्हान असे सांगितल्याने पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन ४ दुचाकी वाहन किंमत १ लाख रुपये,३२० किलो कोळसा किमंत ३२०० रु ,३१० किलो लोखंडी साहित्य किंमत १०,६००,एक मोबाइल किंमत १०,००० ,पाच हैस्वा फ्रेम व ब्लेड किंमत ३०० रु असा एकुण १,२४,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

         कन्हान पोलीसांनी वेकोली डब्लुसीएल सिक्युरिटी गार्ड इंचार्ज संतोष यादव यांच्या तक्रारी वरून पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .