ऋषी सहारे
संपादक
आरमोरी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या वतीने फेब्रुवारी मार्च 2023 इयत्ता बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने नुकताच जाहीर करण्यात आला यामध्ये यशवंत कला कनिष्ठ महाविद्यालय ठाणेगाव डोंगरगाव येथील कु वैष्णवी मुकरूजी नेवारे या विद्यार्थिनीने 74.50% गुण घेऊन डोंगरगाव केंद्रातून पहिला येण्याचा मान मिळवुन यशाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही नेहमीप्रमाणेच केंद्रातून पहिला येण्याचा मान वैष्णवी ने मिळविला त्यासोबतच कु टीना कांबळी हिने 62.83% तर कु श्रद्धा सहारे हिने 61.17 व निलेश धकाते याला 60.67% गुण मिळवून विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली विद्यालयाचा एकूण निकाल 92 टक्के लागला असून सर्व यशस्वी व गुणवंत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटी तथा श्री संताजी समाजसेवा प्रतिष्ठान आरमोरी चे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे सचिव डॉ सचिन खोब्रागडे यांनी शब्दसुमनाने अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या सोबतच विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत झिमटे प्रा कु साधना कन्नाके प्रा प्रवीण तिजारे यांनी सुद्धा विद्यार्थ्याचे व त्याचे पालक यांचे अभिनंदन केले.