रानमाळवर आणि डोंगरदऱ्यांत पळसाची झाडे केशरी-लाल रंगाच्या फुलांनी बहरली आहेत.
शिशिराची पानगळ संपत आल्यावर वसंतोत्सवाच्या स्वागतासाठी पळस नटला आहे.
मौजा पळसगाव सह चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पळसाचे बहरलेले दृश्य पाहण्यास मिळत आहे.
पळसाची फुले होळी/रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंग बनवण्यासाठी उमलले आहेत.
उन्हाळ्यात मनुष्यांना लागलेल्या झावेला मारुन टाकणारे पळसवृक्ष हे एक वनस्पती औषध आहे,त्याचीच पाने उपयोगात आणली जातात पत्राळी बनविण्यासाठी!…
याच त्या पळसवृक्षच्या फांद्या पोळ्याच्या पाडव्याला दिसतय घराच्या दारा पुढे…
उन्हाळ्याची चाहूल लागताच हे बहरलेले पळस विस्तीर्ण माळरानावर आगीच्या ज्वाळांसारखे दिसत असून निसर्गाचे,विलोभनीय रूप सादर करत आहेत.



