Home देशविदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारत देशातील प्रत्येक नागरिकांचे,(महिला-पुरुषांचे) अस्तित्व,चारित्र्य आणि भारताचे हृदय…. ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारत देशातील प्रत्येक नागरिकांचे,(महिला-पुरुषांचे) अस्तित्व,चारित्र्य आणि भारताचे हृदय…. — प्रजासत्ताक दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम स्थळी फोटो न लावणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची चौकशी करणे आवश्यक! — प्रजासत्ताक दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व विशद न करणाऱ्या मंत्र्यांवर,अधिकाऱ्यांवर,कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे…. — त्यांचे अमानवीय कृत्य आणि त्यांची भेदभाव व द्वेष करणारी कृती…

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

          राज्य घटनेत भारत देशातील लोकांच्या भावभावना व आशा आकांक्षा परावर्तित झालेल्या आहेत.यामुळे राज्य घटनेने भारत देशातील तमाम लोकांचे सर्व बाजूंनी संरक्षण केले आहे व अधिकारांतर्गत सर्व प्रकारच्या उन्नतीचे मार्ग खुले केले आहेत.यामुळेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारताचे राष्ट्र निर्माता आणि जगातील महिला पुरुषांचे आदर्श मार्गदाता,प्रेरणास्रोत डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारत देशातील तमाम सर्व महिला-पुरुषांचे अस्तित्व आहेत आणि भारत देशाचे हृदय आहे.

          आधुनिक काळातील भारत देशाचे सर्वोत्तम चारित्र्य,सर्वोच्च अस्तित्व,आणि सर्वात मोठे विस्तारलेले हृदय म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होत.

             म्हणजेच अनेक संघर्षाच्या माध्यमातून आणि राज्य घटनेच्या माध्यमातून भारत देशातील तमाम लोकांच्या अस्तित्वाचे,चारित्र्याचे,हृदयाचे जतन व संरक्षण करणारे युगप्रवर्तक-युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होत.

            अशा जगमान्य थोर समाजसुधारकाला आणि,”प्रजासत्ताक दिनालाच उदयास आणणाऱ्या राष्ट्र निर्मात्याला, जातीभेदातंर्गत,द्वेषातंर्गत भारत देशातील पदप्रमुखांनी,अधिकाऱ्यांनी,कर्मचाऱ्यांनी,महिला-पुरुषांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नाकारले जाणे म्हणजे स्वत:च्या अस्तित्वाला,चारित्र्याला,हृदयाला नाकारणे होय व स्वत:च्या अधिकारासह स्वत:ला संपविण्याचा पाया रचणे होय.नव्हे तर स्वत:च्या आयुष्याची राखरांगोळी करणे होय.

                 महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या इतिहासात नोंद झाले आहेत.यामुळे त्यांनी भेदभाव व द्वेष न करता भारत देशातील तमाम महिला-पुरुषांच्या उध्दारासाठी केलेले महान इतिहासिक कार्य,त्यांचे इतिहासिक शिलसंपन्न चारित्र्य,त्यांचे इतिहासिक अस्तित्व,भारत देशातील कुठलाही शक्तीशाली व सर्वसाधारण व्यक्ती नष्ट करु शकत नाही,संपवू शकत नाही,हे वास्तव आणि सत्य आहे.

               डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाच्या जगप्रसिद्ध व जगमान्य युगपुरुषांनी राज्य घटनेच्या माध्यमातून कायद्याचा कायदा केला आणि भारत देशातील तमाम महिला-पुरुषांना आवश्यक उन्नतीचे-प्रगतीचे मार्ग खुले करुन दिले,त्यांना उत्तम जगण्यासाठी कायदेशीर अधिकार अस्तित्वात आणले,त्यांचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर अधिकार राज्य घटनेच्या माध्यमातून बहाल केले,त्याच महापुरुषांना प्रजासत्ताक दिनी व इतर दिनी न मानने हे भारत देशातील सर्व कायदेशीर पदस्थांचे,अधिकाऱ्यांचे,कर्मचाऱ्यांचे आणि नागरिकांचे अमानवीय कृत्य तर आहेच,परंतु भेदभाव व द्वेष करणारी कृती आहे.

             भारत देशातील महिला-पुरुषांना,”मनुस्मृतीच्या आणि धर्मग्रथांच्या भेदभाव युक्त,द्वेष युक्त, अत्याचारी,अणन्यायकारी,अधिकारविहिन कायद्याच्या,नितीच्या व नियतीच्या,जाचक गुलामगिरीतून अपार कष्टातंर्गत,प्रचंड संघर्षातंर्गत,अभूतपूर्व महा ज्ञानाच्या बलावर,”राज्य घटनेच्या माध्यमातून,मुक्त केले.

            त्याच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान,द्वेष,भेदभाव,करणारी उच्च पदस्थांची,अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची कृती आणि त्यांचे कृत्य हे राष्ट्राला धोका निर्माण करणारे आहेत.याचबरोबर भेदभाव जोपासणारे आहेत आणि द्वेष पसरविणारे आहेत.असे कृत्य व अशी कृती करण्याचा कुठल्याही अधिकार कुणालाही नाही.

              म्हणूनच राष्ट्रपती असोत की राज्यपाल,प्रधानमंत्री असोत की मुख्यमंत्री,मंत्री असोत की,राज्यमंत्री असोत,न्यायमुर्ती असोत की अधिकारी असोत,कर्मचारी असोत की राजकीय पक्षांचे पदाधिकारी असोत,सामाजिक संघटानाचे पदाधिकारी असोत की सर्वसामान्य नागरिक असोत,यांनी भारत निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान,द्वेष,भेदभाव करायलाच नकोय.

             ज्यांनी तुम्हाला घडवलं,कायद्यानुसार व कार्यपद्धती नुसार अस्तित्वात असलेल्या पदावर बसवलं आणि अधिकारी व कर्मचारी बनन्याची संधी दिली,योग्य जगण्याचा अधिकार दिला,त्याच अनेक पदस्थ प्रमुखांनी,अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जगमान्य असलेल्या महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान,द्वेष,भेदभाव करावा,ही त्यांची अत्यंत खालच्या स्तरावरील निच वृत्तीची मानसिकता आहेत असेच म्हणावे लागेल.

         अशा पदस्थांना वेळीच पदमुक्त केले पाहिजे आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळ न गमावता बडतर्फ केले पाहिजे.याचबरोबर त्यांच्यावर देशद्रोहातंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे.

         याचबरोबर राज्य घटनेने कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता भारत देशातील महिला-पुरुषांना,राष्ट्रपती,राज्यपाल,खासदार,आमदार,नगरसेवक,जिल्हा परिषद सद,प.स.सदस्य,ग्रामपंचायत सदस्य,(लोकप्रतिनिधी) व इतर पदप्रमुख,होण्याचा अधिकार दिला आणि अधिकारी व कर्मचारी होण्याचा अधिकार दिला हे या देशातील राजकारण्यांच्या,सामाजिक संघटाना पदाधिकाऱ्यांच्या,अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या,महिला-पुरुषांच्या लक्षात केव्हा येईल?

         खासदार या लोकप्रतिनिधी मधून प्रधानमंत्री,केंद्रीय मंत्री,केंद्रीय राज्यमंत्री,स्वतंत्र प्रसार मंत्री व इतर समितीचे आणि संस्थांचे प्रमुख होण्याचा अधिकार दिला.

         तर आमदार यांच्यामधून मुख्यमंत्री,कॅबिनेट मंत्री,राज्यमंत्री,मंत्रालयातंर्गत समितीचे अध्यक्ष,सदस्य व इतर प्रकारचे पदप्रमुख होण्याचा अधिकार दिला. 

         याचबरोबर नगरसेवकांमधून महापौर,उपमाहापौर,नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,इतर समितीचे सभापती,नियोजन समितीचे प्रमुख आणि सदस्य होण्याचा अधिकार दिला.

          तद्वतच जिल्हा परिषद सदस्यांमधून जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष,विविध समित्यांचे सभापती व सदस्य होण्याचा अधिकार दिला.

         आणि पंचायत समिती सदस्या मधून सभापती,उपसभापती,इतर समितीचे सदस्य होण्याचा अधिकार दिला.

              एवढेच काय या देशातील महिला पुरुषांना विविध क्षेत्रातील अधिकारी,कर्मचारी,न्यायमुर्ती,वकील,डाॅक्टर,समाजसेवक,राजकारणी,पक्ष प्रमुख,संघटना प्रमुख,संस्थाप्रमुख होण्याचा अधिकार दिला.

           ग्रामीण भागाचा कणा असलेल्या ग्रामपंचायत सदस्या मधून सरपंच,उपसरपंच,आणि इतर समितीचे सदस्य होण्याचा अधिकार दिला.

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या भारत देशासह जगातील सर्वोत्तम प्रकांड पंडित,जगातील महान समाजसुधारक,घटनाकार,यांचे प्रजासत्ताक दिनी नाव न घेणे हे भयंकर कुटनितीचे कटकारस्थान आहे.अशा कुटनितीच्या कटकारस्थानाला भारत देशातील तमाम महिला-पुरुषांनी वेळीच ओळखले पाहिजे व त्यांना मनातून काढत त्यांचा आदर करणे,त्यांना सहकार्य करणे बंद केले पाहिजे.

         ज्यांच्यामुळे आज आपण हा लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहोत,त्या राज्यघटनाकारांचे नाव भाषणात न येणे किंवा त्यांच्या बाबत उपस्थितांना माहिती न देणे हे अत्यंत दुर्दैवी आहे….