आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत समर्थ महाविद्यालयाचे खेळाडू सहभागी…

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

 लाखनी :- राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनीचे खेळाडू आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.स्वाती उईके आणि समीर देशमुख अनुक्रमे लांब उडी आणि साखळी गोळा फेक साठी विद्यापीठ संघात निवडले गेले आहेत.

             आंतर विद्यापीठ स्पर्धा भुवनेश्वर (ओरीसा)येथे(२६डिसेंबर)ला सुरू होत असून यासाठी विद्यापीठ संघ भुवनेश्वर येथे दाखल झालेला आहे.

              आंतर विद्यापीठ स्पर्धेत नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान भंडारा जिल्ह्यातील समर्थ महाविद्यालयास प्राप्त झाला आहे.यासाठी या दोन्ही खेळाडूंचे जिल्हा स्तरावर कौतुक होत आहे.

             भुवनेश्वर येथे आजपासून होत असणार्‍या आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत सहभागी होऊन चमकदार कामगिरी करून दणदणीत विजय मिळवून यश संपादन करावे अशी अपेक्षा संस्था अध्यक्ष आल्हाद भांडारकर, प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे, सर्व सहकारी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी व्यक्त केली आहे.