इंडियन फ्रेन्ड्स कडून साकोलीत नाताळ उत्सव…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

          साकोली : इंडियन फ्रेन्ड्स फेलोशिपद्वारे शिवाजी वार्डातील बॅंगलोर डिजे लॉनमध्ये नाताळ ( क्रिसमस ) उत्सव साजरा करण्यात आला. येथे लहान मुलांसाठी केक आणि सांताक्लॉज भेटवस्तू देत मुलांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. 

            इंडियन फ्रेन्ड्स फेलोशिपच्या आयोजनात शिवाजी वार्डातील बॅंगलोर डिजे लॉनमध्ये हा नाताळ उत्सव साजरा केला. कार्यक्रमात लहान मुलांसाठी केक सजावट, क्रिसमस ट्री व सांताक्लॉजतर्फे भेटवस्तू देऊन लहान मुलांचा हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला हे विशेष.

              याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ता अंकीत रहांगडाले, सुरैया वाघमारे,नुतन राऊत, शिला रामटेके व इतर हजर होते. नाताळ उत्सव साजरा करण्यासाठी इंडियन फ्रेन्ड्स फेलोशिपचे सोनिया हटोले, विनोद हटोले, विभू राऊत व सर्व सदस्यांनी विशेष सहकार्य केले.