Home Social आंबोली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व राजाराम पाटील वारजूकर विद्यालयात...

आंबोली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व राजाराम पाटील वारजूकर विद्यालयात संविधान दिवस साजरा…

शुभम गजभिये..

 विशेष प्रतिनिधी…

         संविधान दिनानिमित्त चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा आंबोली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व राजाराम पाटील वारजूकर विद्यालयात कार्यक्रम पार पडलाय…

      यावेळी श्री.राजाराम पाटील वारजुकर विद्यालय आंबोली व जिल्हा परिषद उच्च प्रा.शाळा आंबोली येथील शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. 

         यावेळी उपस्थित मान्यवरांनी संविधान या विषयावर मार्गदर्शन केले.याचबरोबर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

       संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्रा.शाळा आंबोली येथे संविधान दिवसासह लहान विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचरा कुठे फेकावा,गाव आदर्श कसा बनविता येईल यावर उपसरपंच ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

         तसेच श्री.राजाराम पाटील वारजुकर विद्यालय आंबोली येथे उपसरपंच ठाकरे यांनी आज आपले मनोगत व्यक्त केले व देशाचे संविधान काय आहे या अनुषंगाने माहिती दिली.

       तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत प्रत्येक रविवारला सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत श्रमदानातून गाव सुंदर करण्यासाठी श्रमदानाला येण्याचे तरुणाईला,विद्यार्थ्यांना आवाहन केले. 

      ग्राम पंचायत आंबोली,तालुका चिमूर,जिल्हा चंद्रपूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान,माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे.