विभागीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी नंदलाल पाटील कापगते विद्यालयाची निवड…

 

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

         साकोली:जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे पार पडले. शालेय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत मुले 19 वर्षे वयोगटामध्ये नंदलाल पाटील कापगते विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय साकोली च्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करून विभागीय स्तरावर भरारी घेऊन विद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवून शाळेचा नावलौकिक केला. 

    चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावर नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली चे विद्यार्थी भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 

    यावेळी विद्यालयाचे प्राचार्य के एस डोये, क्रीडाशिक्षक आर बी कापगते, आर व्ही दिघोरे , प्रा. बी पी बोरकर, प्रा. सौ एस एन गहाणे, प्रा. के जी लोथे, डी डी तुमसरे, डी आर देशमुख, एस व्ही कामथे इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.