मुल तालुक्यात युरिया खताचा कृत्रिम तुटवडा… — खताचा तुटवडा दूर करून युरिया खताची चढ्या दराने शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी…

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

            मुल:- तालुक्यातील शेतकऱ्यांना कृत्रिमरित्या युरिया खताचा तुटवडा करून चढ्या दराने खते विकणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. युरिया खताचा प्रचंड तुटवडा पडलेला असून शेतकऱ्यांना ज्यादा दरात युरिया खत घ्यावे लागत आहे. कृषी केंद्राचे व्यापारी जास्त नफा कमवण्याच्या उद्देशाने युरिया खताचा स्टॉक करून जास्त नफा मिळणाऱ्या ईतर कंपनीच्या खताचा ज्यादा भावाने शेतकऱ्यांना विकत आहेत.

          तालुक्यातील शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असून युरिया खतासाठी शेतकऱ्यांना इकडे तिकडे फिरावे लागत आहे. ऐनवेळी हंगामातच खताची आवश्यकता असतानाच शेतकऱ्यांना हेतू परस्पर लुटल्या जाते. युरिया या खताचा तुटवडा दाखवून शेतकऱ्यांना नेहमी त्रास दिल्या जातो याबाबत प्रशासकीय स्तरावरून याची गंभीर दखल घेऊन युरिया खताचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात यावा व जे कृषी केंद्र चढ्या दराने शेतकऱ्यांची लूट करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीला घेऊन काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.

          निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरु गुरनूले, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष पवन निलमवार, काँग्रेसचे युवा नेते प्रशांत उराडे, माजी सरपंच जालिंदर बांगरे, धनराज रामटेके आकाश दहिवले, दामोदर लेनगुरे, संदीप मस्के तथा काँग्रेसच्या अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.