शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चंद्रपूर जिल्हा मध्य.सह.बँक नेरी व किसान मित्र ग्रामीण विकास संस्था नेरी ता.चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाखा नेरी येथे बचत गटाचा कर्ज वाटप मेळावा दिनांक : 25 ऑगस्ट 2025 रोज सोमवारी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजय डोंगरे साहेब उपाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बँक चंद्रपूर, प्रवीण नागपुरे शाखा व्यवस्थापक शाखा नेरी,पुरुषोत्तम वाळके अध्यक्ष किसान मित्र संस्था नेरी, चौधरी साहेब शाखा निरीक्षक शाखा नेरी, मंजुषा पिसे ग्रेड 2 ऑफिसर शाखा नेरी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संजय डोंगरे साहेब उपाध्यक्ष यांचा किसान मित्र संस्था नेरी चे अध्यक्ष पुरुषोत्तम वाळके यांनी शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच बचत गटातील महिलांनी सुध्दा डोंगरे साहेबाचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. संजय डोंगरे यांच्या हस्ते मुख्य कार्यालय चंद्रपूर व नेरी शाखे अंतर्गत किसान मित्र संस्था द्वारा स्थापन केलेले आशा महिला बचत गट नेरी व संत गोरोबा काका महिला बचत गट नेरी यांना 9 लाख रुपये कर्जाचा धनादेश देऊन कर्ज वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संजयभाऊ डोंगरे यांनी बचत गटातील महिलांनी प्रायवेट फायनान्सचे कर्ज न घेता कमी व्याजदरात जिल्हा बँकेचे कर्ज घ्यावे, बचत गटांना बँके कडून मिळणाऱ्या सुविधा, तसेच बचत गटांना कर्ज पुरवठा, व 4 टक्के व्याज परतावा व महिला सक्षमीकरण या वर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रवीण नागपुरे साहेब, पुरुषोत्तम वाळके व मंजुषा पिसे यांनी सुध्दा विविध विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी बँकेचे कर्मचारी सुनील पराते, लोकेश जांभूळकर, लोकेश डोंगरवार, संस्थेचे कार्यकर्ते नितेश ढोक, नितीन नगराळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तसेच बँकेचे कर्मचारी अरुण रणदिवे, वैभव नागपुरे उपस्थित होते. या मेळाव्याला महिला बचत गटातील 35 महिला उपस्थित होत्या यां कार्यक्रमाचे संचालन नितेश ढोक व आभार प्रदर्शन नितीन नगराळे यांनी केले.



