शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
मागील 2 वर्ष पासून विहीरगांवातील नाल्याची सफाई झांली नाही.त्यामुळे नाल्यातील घनकचरा व सांडपाणी लोकांच्या घरात घुसले असल्याचे चित्र आहे.

पाऊसाला हजेरी लावून चक्क दोन महिने झाले,पण विहीरगाव येथील ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांना आणि ग्रामसेवकाला नाल्यांची सफाई करण्यासंबंधाने जाग आली नाही..
म्हणूनच पावसामुळे विहिरगाव येथील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे,संपूर्ण पावसाचे पाणी हे नागरिकांच्या घरात घुसले आहे..नागरिकांच्या रास्त मागणीला ग्रामपंचायत पदाधिकारी दुर्लक्ष का म्हणून करतात हेच कळायला मार्ग नाही..




