Home सांस्कृतिक श्रावण महिन्यात काटकुंभ ते कोयलारी सोमेश्वर बाबा कावड पदयात्रेला उत्साहात सुरुवात…

श्रावण महिन्यात काटकुंभ ते कोयलारी सोमेश्वर बाबा कावड पदयात्रेला उत्साहात सुरुवात…

   अबोदनगो चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

         दखल न्युज भारत

       श्रावण महिन्यात काटकुंभ गावातून सोमेश्वर बाबांच्या दर्शनासाठी कोयलारी येथे भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली.

         या पवित्र कावड पद यात्रेत गावातील अनेक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला विशेष म्हणजे महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत भक्तिभावाने कावड वाहून सहभागी होण्याचा आदर्श घालून दिला पावसाच्या सरींच्या साक्षीने “बोल बम” च्या जयघोषात श्रावण कावड यात्रेने उत्साहाने मार्गक्रमण केले यात्रेपूर्वी गावात पारंपरिक पूजा अभिषेक व भजनांचा कार्यक्रम पार पडला.

          कावडींनी सजलेले मार्ग, भगव्या झेंड्यांनी नटलेले वातावरण आणि भक्तीमय गीतांनी निनादलेली वाट हे दृश्य अत्यंत मनोहारी होते या यात्रेने गावात एकात्मतेचा संदेश दिला असून, श्रद्धा,भक्ती आणि सामाजिक ऐक्य याचे प्रतीक म्हणून या कावड यात्रेकडे पाहिले जात आहे.

                ग्रामस्थांच्या सहकार्याने यात्रेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले ही कावड पद यात्रा भाविकांसाठी श्रद्धेचे प्रतीक बनून दरवर्षी नव्या उत्साहात साजरी होत आहे.