Home Political शिवसेना तालुका चिमूरची संघटनात्मक बैठक संपन्न!..  — भाजप व उबाठा शिवसेनाच्या...

शिवसेना तालुका चिमूरची संघटनात्मक बैठक संपन्न!..  — भाजप व उबाठा शिवसेनाच्या कार्यकर्त्यांनी घेतला शिंदे शिवसेनेत प्रवेश!..

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

 शिवसेना( शिंदे गट) तालुका चिमूरची संघटनात्मक बैठक जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत जि.प.विश्रामगृहात नुकतीच पार पडली. या बैठकीत भाजप, उबाठा शिवसेनाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.

         सदरहु बैठकीत जिल्हा प्रमुख नितीन मत्ते व युवा सेना जिल्हा प्रमुख आलेख रट्टे यांनी गाव तिथं शाखा उघडून शाखा प्रमुख, शिवदूत, बूथ प्रमुख पदी शिवसैनिकांना नेमणूक करण्याचे मार्गदर्शन केले.

          भाजप जेष्ठ कार्यकर्ते डॉ. वसंत झोडे, राहुल शंभरकर, सुनील दूधनकर ,रामदास श्रीरामे तसेच उबाठा शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सचिन शेटे, तानाजी सहारे बोथली,उप शहर प्रमुख नंदू कामडी, कांग्रेसचे झामदेव आत्राम जांभूळघाट यांनी शिवसेना पक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्या वर प्रेरित होऊन जिल्हा प्रमुख नितीन मत्ते, युवासेना जिल्हाप्रमुख आलेख भाऊ रट्टे व तालुका प्रमुख विलास डांगे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

        प्रवेश घेतेवेळी शिवसैनिक सुरज शाहा, शिवसैनिक सुमित हस्तक, वैभव डांगे, सुनील धोटे, जयेंद्र सवाईमुन उपस्थित होते.